सिंधुदुर्ग/ प्रतिनिधी –
१० वीच्या निकालात दरवर्षीप्रमाणे यंदाही सिंधुदुर्ग जिल्ह्याने बाजी मारली आहे. ९९.४२ %सह सलग ११ व्या वर्षी कोकण बोर्डासह राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. मार्च २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातून १० हजार १११ विध्यार्थी परीक्षेला बसले होते. पैकी १० हजार ५३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे.