Tarun Bharat

ऑटो क्षेत्रात टाटा, महिंद्रा यांचा बाजारातील वाटा वाढला

मारुती, ह्युंडाई पिछाडीवर : फाडा संघटनेकडून माहिती सादर

मुंबई : फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डिलर्स असोसिएशन (फाडा) संघटनेने दिलेल्या माहितीनुसार फेब्रुवारीमध्ये मारुती सुझुकी आणि ह्युंडाई या कंपन्यांच्या कार विक्रीमध्ये अपेक्षित प्रतिसाद ग्राहकांचा लाभला नाही. तर दुसरीकडे टाटा मोटर्स, महिंद्रा आणि कियाइंडिया यांच्या वाट्यात मात्र वाढ नोंदवली गेली. मारुती सुझुकी या कंपनीने मागच्या महिन्यात 1 लाख 18 हजार 892 कार्सची विक्री केली आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये हीच विक्री 1 लाख 9 हजार 611 इतकी होती. बाजारातील वाटा मारुती सुझुकी आणि ह्युंडाई मोटर इंडिया यांचा फेब्रुवारीत कमी राहिला आहे. टाटा मोटर्स, महिंद्रा आणि किया इंडिया या कंपन्यांनी मागच्या महिन्यात कार विक्रीमध्ये चांगली प्रगती दर्शविली आहे. मारुती सुझुकीने मागच्या महिन्यामध्ये बाजारामधील वाट्यामध्ये 41 टक्के घट दर्शविली आहे. ह्युंडाई मोटर इंडिया यांचाही बाजारातील वाटा 13 टक्के घसरणीत राहिला आहे. मागच्या महिन्यात कंपनीने 39,106 कार्सची विक्री केली होती. मागच्या वर्षी याच महिन्यात 38,688 कार्सची विक्री झाली होती.

टाटा, महिंद्रा आणि किया यांचे योगदान

टाटा मोटर्सने मागच्या महिन्यात 38,965 कार्सची विक्री केली होती तर मागच्या वर्षी याच महिन्यात 34,055 इतक्या कार्स विकण्यात आल्या होत्या. बाजारातील वाटा यायोगे 13 टक्के इतका वाढवण्यामध्ये कंपनीला यश आले आहे. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने सुद्धा मागच्या महिन्यामध्ये 29,356 कार्सची विक्री करत बाजारातील वाटा 10 टक्के इतका वाढवला आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये 18,264 कार्सची विक्री कंपनीने केली होती. दुसरीकडे किया इंडियाने 19,554 कार्सची फेब्रुवारीत विक्री करत 6.81 टक्के इतका वाटा बाजारात हस्तगत केला आहे. टोयोटा किर्लोस्कर मोटर आणि स्कोडा ऑटो यांनीसुद्धा बाजारातील वाट्यामध्ये वाढ दर्शवली आहे.

Related Stories

नवी वेगनार बाजारात दाखल

Patil_p

नोव्हेंबरमध्ये वाहन क्षेत्राला ‘अच्छे दिन’

Amit Kulkarni

हिरो सुपर स्प्लेंडरची एक्सटीइसी आवृत्ती बाजारात

Patil_p

BS6 इंजिनसह होंडा ‘शाईन’ लाँच

tarunbharat

टाटाच्या सीएनजी कार्स दाखल

Patil_p

पियाजिओची वाहन विक्री एप्रिल-नोव्हेंबरमध्ये 15 हजारांवर

Amit Kulkarni