Tarun Bharat

मॉडर्न जिमच्या स्पर्धा उत्साहात

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव

मॉडर्न जिमतर्फे आयोजित करण्यात आलेल्या फिटनेस चॅलेंज स्पर्धा मोठय़ा उत्साहात पार पडल्या. सदर स्पर्धेत 60 स्पर्धकांनी भाग घेतला होता. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे मॉडर्न जिमचे संचालक किरण कावळे, विकास किल्लेकर, संजय पुजार, ओंमकार कंग्राळकर, माडीवाले, प्रशिक्षक किर्तेश कावळे उपस्थित होते. खालील स्पर्धकांनी यश संपादित केले. सर्व स्पर्धकांना पाहुण्यांचे हस्ते बक्षिसे देण्यात आली.

स्क्वॅट विभागात भीम सुरते प्रथम, विशाल इंगोली द्वितीय, सचिन पाटील तृतीय. पुश अप विभागात नदीम मिर्झा प्रथम, अमृत कांगले द्वितीय, अरबाज खान तृतीय.

पुलअप्स विभागात अरबाज खान प्रथम, ओमकार कंग्राळकर द्वितीय, वाशीम बेपारी तृतीय. स्क्वॅट जंप विभागात अमृत कांगले प्रथम, रोहन कारेकर द्वितीय, नदीम मिर्झा तृतीय. जंपिंग जॅक विभागात राहुल कडोलकर प्रथम, रोहन कारेकर द्वितीय, दुगाराम प्रजापत तृतीय. प्लँक विभागात भीम सुरते प्रथम, नदीम मिर्झा द्वितीय, वाशीम बेपारी तृतीय. जिमचे प्रशिक्षक किर्तेश कावळे यानी अभार मानले.

Related Stories

काँग्रेस रोड-खानापूर रोडवर वाहनांची कोंडी

Amit Kulkarni

विविध ठिकाणी योग दिन साजरा

Amit Kulkarni

सुधीर कुलकर्णी यांनी साधला जीआयटी-व्हिटीयु विद्यार्थ्यांशी संवाद

Patil_p

राज्यस्तरीय हॅण्डबॉल स्पर्धेत बेळगाव उपविजेता

Amit Kulkarni

उचगाव मराठी साहित्य संमेलन 24 जानेवारीला घेण्याचा निर्णय

Patil_p

कौशल्य शिक्षणात पारंगत होणे आवश्यक

Amit Kulkarni