Tarun Bharat

डॉक्टरच्या घरात पावणेदोन लाखांची चोरी

नाचणे-सहकारनगर येथील घटनेची शहर पोलिसांत नोंद

प्रतिनिधी/ रत्नागिरी

रत्नागिरी शहरालगतच्या नाचणे सहकारनगर येथे चोरटय़ांनी एका डॉक्टरच्या घरावर मोठा डल्ला मारला. घर फोडून पावणेदोन लाखांची चोरी करण्यात आली. ही घटना 5 ते 7 नोव्हेंबर या कालावधीत घडली.

  या बाबतची फिर्याद डॉ. ताराचंद सीताराम पुजारी (72, नाचणे) यांनी रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. ताराचंद पुजारी  5 ते 7 नोव्हेंबर 2022 या कालावधीत बाहेरगावी गेले होते. 7 नोव्हेंबर रोजी सकाळी ते घरी आले असता त्यांच्या घराच्या मागील खिडकीचे लोखंडी गज कापून, तोडून, वाकवून अज्ञात घरात घुसल्याचे सांगण्यात आले. घरातील बेडरुमच्या कपाटातील सोन्या, चांदीचे दागिने, रोख रक्कम असा एकूण 1 लाख 67 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला. यात 48 हजारांची रोख रक्कम, 1 लाख 19 हजार 900 रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने असा ऐवज लंपास केला. डॉ. पुजारी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी अज्ञातावर भादंवि कलम 454, 457, 380 नुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक महाले करत आहेत.

Related Stories

राज्यस्तरीय गणेश गीत गायन स्पर्धेत नितीन धामापूरकर यांचे यश

NIKHIL_N

अमित शहा लवकरच कोकण दौऱ्यावर; प्रमोद जठारांची माहिती

Archana Banage

रत्नागिरी : पूरमुक्त साखरप्यासाठी ‘नाम’चा पुढाकार!

Archana Banage

राजापूर पंचायत समितीच्या नवीन इमारतीसाठी हालचाली सुरू

Archana Banage

तोरसेतील अपघातात कालेलीचा युवक ठार

NIKHIL_N

दापोलीत आणखी एक पोस्ट घोटाळा!

Patil_p