लाखो भाविकांचे मंदिराला सढळ हस्ते दान
वार्ताहर /बैलहोंगल
कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील यल्लम्मा देवीच्या मंदिराच्या दानपेटीत गेल्या एप्रिल महिन्यापासून ते 30 जूनअखेर दोन कोटी 15 लाखाहून अधिक रक्कम जमा झाल्याची माहिती मंदिराचे कार्यनिर्वाहक अधिकारी एस. बी. दोड्डगौडर यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितली.
मंगळवारी पुन्हा दानपेटी खोलण्यात आली. गेल्या 10 दिवसात 33 लाखाहून अधिक रक्कम व पाच लाखाहून अधिक सोने व 62 हजाराहून अधिक चांदी यल्लम्मा देवीच्या भक्तानी रेणुकाचरणी अर्पण केले आहे या दानपेटय़ांतील दानाची ईन कॅमेराद्वारे मोजणी करण्यात आली आहे.
यात गेल्या तीन महिण्यात 30 जूनअखेर दोन कोटी 15 लाखाहून अधिक रक्कम आढळून आली आहे. याप्रसंगी देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बसय्या हिरेमठ, सदस्य वाय. वाय. काळप्पनावर, कोळप्पगौडा गंदिगवाड, रमेश गोमाडी, बसवराज जिरगाळ, अरविंद माळगे, नागरत्ना चोळीन आदी उपस्थित होते.