ओल्या चाऱयातून रोगाची लागण, शेळय़ा-मेंढय़ांना दिली लस
प्रतिनिधी /बेळगाव
पावसाळय़ाच्या तोंडावर ओल्या चाऱयातून शेळय़ा मेंढय़ांना विविध आजारांची लागण होते. या पार्श्वभूमिवर पशुसंगोपन खात्यामार्फत दरवषी आंत्रविषार (ईटी) प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविली जाते. यंदा एप्रिल आणि मे महिन्यातच अधिक पाऊस झाला. त्यामुळे ओला चारा लवकर आला. त्यामुळे लसीकरण मोहिमही लवकरच राबविण्यात आली.
जिल्हय़ात 28 लाखाहून अधिक जनावरांची संख्या आहे. त्यामध्ये गाय, म्हैस, बैल, गाढव, घोडा, कुत्रा, शेळय़ा, मेंढय़ांचा समावेश आहे. पावसाळय़ाच्या सुरूवातीला शेळय़ा मेंढय़ांना साथीच्या आणि इतर रोगाची लागण होते. या आजारापासून दूर ठेवण्यासाठी शेळय़ा, मेंढय़ांना प्रतिबंधक लस दिली जाते. मागील महिन्याभरापासून आंत्राविषार प्रतिबंधक लस दिली जात आहे. मागील दोन वर्षात कोरोनामुळे ही लसीकरण मोहीम थांबली होती. मात्र यंदा लसीकरण मोहिमेला पूर्ववत प्रारंभ झाला.
एप्रिलपासून मोहिमेला प्रारंभ
जिल्हय़ात शेळी पालन करणाऱया आणि धनगर समाजाची संख्या अधिक आहे. त्यामुळे जिल्हय़ात साडेआठ लाख शेळय़ा तर 9 लाख मेंढय़ांची संख्या आहे. यामध्ये धनगर समाजातील मेंढय़ांची संख्या अधिक आहे. शेळय़ा-मेंढय़ा या चरण्यासाठी बाहेर सोडल्या जातात. दरम्यान पावसामुळे आलेल्या ओल्या चाऱयातून आजाराची लागण होत असते. या पार्श्वभूमिवर दरवषी प्रतिबंधक लसीकरण मोहीम हाती घेतली जाते. दरवषी मे अखेरीस मोहीम राबविली जाते. मात्र यंदा उन्हाळय़ातच अधिक पाऊस झाल्याने एप्रिलपासून या मोहिमेला प्रारंभ झाला आहे.
पशु वैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधा
तालुक्मयात सर्व पशु वैद्यकीय दवाखान्यातून ईटी प्रतिबंधक लस दिली जात आहे. प्रतिबंधक लसीकरण मोहीम अंतिम टप्प्यात आली आहे. अद्यापही ज्या शेळय़ा, मेंढय़ांना लस द्यायची आहे त्यांनी जवळच्या पशु वैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा.
-डॉ. श्रीकांत गांवी (तालुका सहाय्यक पशु अधिकारी)