क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
सार्वजनिक शिक्षण खाते व ओरिएंटल स्कूल आयोजित छत्रपती शिवाजी क्लस्टर प्राथमिक विभागीय फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात एम. व्ही. हेरवाडकर संघाने संत मीरा संघाचा सडनडेथमध्ये 3-2 अशा गोलफरकाने पराभव करून विजेतेपद पटकाविले.
सुभाषचंद्र लेले मैदानावर घेण्यात आलेल्या या फुटबॉल स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य सामन्यात एम. व्ही. हेरवाडकर संघाने मुक्तांगण संघाचा 4-0 असा पराभव केला. या सामन्यात वेदांत पाटीलने तिसऱया मिनिटाला, अथर्व नाकाडीने अकराव्या मिनिटाला, दुसऱया सत्रात अभय भेंडिगेरीने 22 व्या मिनिटाला, अर्थव नाकाडीने 30 व्या मिनिटाला चौथा गोल नोंदवत एकतर्फी विजय मिळविला. दुसऱया उपांत्य सामन्यात संत मीरा संघाने जी. जी. चिटणीस संघाचा सडनडेथमध्ये 1-0 असा पराभव केला. निर्धारीत वेळेत व टायब्रेकरमध्येही दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले. त्यानंतर सडनडेथ नियमांचा वापर करण्यात आला. सडनडेथमध्ये 1-0 अशा गोलफरकाने संत मीराने विजय संपादन केला. त्यात अब्दुल मुल्लाने एकमेव गोल केला.
अंतिम सामन्याचे उद्घाटन ज्ये÷ व्हॉलिबॉलपटू हर्षवर्धन शिंगाडे व यशोधर जैन यांच्या हस्ते करण्यात आले. या सामन्यात निर्धारीत वेळेत दोन्ही संघाना गोल करण्यात अपयश आल्याने पंचानी टायब्रेकर नियमाचा वापर केला. त्यामध्ये दोन्ही संघांनी 2-2 अशी बरोबरी केली. हेरवाडकरतर्फे वेदांत व अभय भेंडिगेरी यांनी गोल केले तर संत मीरातर्फे अब्दुल्ला मुल्ला व प्रतिक पालेकर यांनी गोल केले. त्यानंतर पंचांनी सडनडेथ नियमाचा वापर केला. त्यामध्ये हेरवाडकरने 3-2 असा पराभव केला. हेरवाडकरतर्फे अथर्व नाकाडीने विजयी गोल केला.
सामन्यानंतर प्रमुख पाहुणे ओरिएंटलच्या मुख्याध्यापिका मंगल तरळे, राजू आर., हर्षवर्धन शिंगाडे, यशोधर जैन, संतोष दळवी, गोपाळ खांडे, बापू देसाई, सी. आर पाटील, उमेश मजुकर, अनिल मुगळी, हागीदाळे आदी मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.