Tarun Bharat

विश्वचषक हॉकी स्पर्धेत, भारताची सलामी स्पेनविरुद्ध

Advertisements

13 जानेवारीपासून स्पर्धेला राऊरकेला येथे प्रारंभ

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

पुढील वर्षी होणाऱया विश्वचषक हॉकी स्पर्धेत यजमान भारताची सलामी स्पेनविरुद्ध होणार असून राऊरकेला येथे नव्याने बांधण्यात आलेल्या बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना 13 जानेवारी रोजी खेळविण्यात येईल.

टेकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या पुरुष हॉकी कांस्यपदक मिळविले होते. एफआयएच जागतिक क्रमवारीत भारतीय संघ सध्या पाचव्या स्थानावर असून या स्पर्धेत भारताचा ड गटात इंग्लंड, स्पेन, पदार्पणवीर वेल्स यांच्यासह समावेश आहे. भारताचा दुसरा सामना 15 जानेवारी रोजी राऊरकेला येथेच इंग्लंडविरुद्ध होईल. शेवटचा गटसाखळी सामना 19 जानेवारी रोजी भुवनेश्वर येथे वेल्सविरुद्ध होईल. गट अ मध्ये जागतिक अग्रमानांकित ऑस्ट्रेलिया, 2016 चे ऑलिम्पिक चॅम्पियन अर्जेन्टिना, फ्रान्स व आफ्रिकन चॅम्पियन दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे. 2018 मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने कांस्यपदक मिळविले होते.

विद्यमान चॅम्पियन बेल्जियमचा गट ब मध्ये 2006 चे विजेते जर्मनी, कोरिया व जपान यांच्यासह समावेश आहे. बेल्जियमला येथे दुसरे तर जर्मनीला चौथे मानांकन आहे. गट क मध्ये मागील उपविजेते नेदरलँड्स (तिसने मानांकन), ओसेनियाचे प्रतिनिधित्व करणारा न्यूझीलंड, मलेशिया व पदार्पण करणारे चिली यांचा समावेश आहे. मलेशिया नवव्यांदा विश्वचषक स्पर्धेत खेळत आहे.

एफआयएचने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार स्पर्धेच्या पहिल्या दिवशी अर्जेन्टिना व दक्षिण आफ्रिका आणि जागतिक अग्रमानांकित ऑस्ट्रेलिया व फ्रान्स यांच्यात भुवनेश्वरमधील कलिंगा स्टेडियमवर लढती होतील. पहिल्या दिवशी भारताचा सामना सायंकाळी 7 वाजता सुरू होणार असून राऊरकेलामध्ये स्पर्धेचा पहिला सामना इंग्लंड व वेल्स यांच्यात होईल. 2018 मध्ये ओडिशात झालेल्या मागील स्पर्धेत जेतेपद मिळविलेल्या बेल्जियमची लढत दक्षिण कोरियाविरुद्ध भुवनेश्वरमध्ये होणार आहे.

Related Stories

आयर्लंड, यूएई टी-20 वर्ल्ड कपसाठी पात्र

Patil_p

ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धा वेळापत्रकात बदल नाही

Patil_p

यू-17 महिला फुटबॉल संघ विदेश दौऱयावर

Patil_p

वरुण चक्रवर्ती तंदुरुस्ती चाचणीत नापास

Patil_p

रबाडा-नोर्त्झेचे आगमन, पहिल्या सामन्यातून मात्र बाहेर

Patil_p

स्कॉटलंडचा अमिरातवर शानदार विजय

Patil_p
error: Content is protected !!