Tarun Bharat

स्वदेशी ‘प्रचंड’ वायुदलात

Advertisements

लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर्समुळे भारत अधिक शक्तिमान

वृत्तसंस्था / नवी दिल्ली, जोधपूर

नवरात्रीच्या अष्टमीच्या दिवशी ‘प्रचंड’ हे पूर्णपणे स्वदेशी बनावटीचे हेलिकॉप्टर  वायुदलाच्या ताफ्यात सामील झाले. बऱयाच वर्षांच्या मेहनतीनंतर सोमवारी वायुदलाला स्वदेशी लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर (एलसीएच) मिळाले आहे.

या हेलिकॉप्टरमध्ये वाळवंट, बर्फाच्छादित पर्वतांसह प्रत्येक स्थितीत शत्रूंवर हल्ला करण्याची क्षमता आहे. त्याची तोफ दर मिनिटाला 750 गोळय़ा डागू शकते. तसेच रणगाडाविरोधी आणि हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे देखील सज्ज ठेवू शकते. या वैशिष्टय़ांमुळे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी त्याला ‘प्रचंड’ असे नाव दिले आहे. पहिल्या स्क्वॉड्रनमधील 15 पैकी दहा हेलिकॉप्टर वायुदलासाठी आणि पाच भारतीय लष्करासाठी देण्यात आली आहेत.

नवीन स्वदेशी ‘मेड इन इंडिया’ लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर दाखल झाल्यामुळे आता भारतीय हवाई दलाची ताकद आणखी वाढली आहे. या स्वदेशी हेलिकॉप्टरसह भारतीय संरक्षण दलाच्या इतिहासात दसऱयापूर्वीच नवीन ‘सोनेरी पान’ जोडले गेले. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला. जोधपूर हवाई तळावर पार पडलेल्या या कार्यक्रमाला चीफ ऑफ एयर स्टाफ चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी यांचीही उपस्थिती होती. या हेलिकॉप्टर्सच्या लाँचिंगप्रसंगी राजनाथ सिंग यांनी या ‘प्रचंड’मधून उड्डाण केले. याप्रसंगी ‘प्रचंड’ हेलिकॉप्टर्सना वायुसेनेत सामील करण्यासाठी नवरात्रीपेक्षा चांगला काळ असू शकत नाही आणि राजस्थानच्या भूमीपेक्षा चांगली जागा नाही, असे त्यांनी नमूद केले. हा भारताचा विजयरथ आहे. ‘एलसीएच’मध्ये सर्व आव्हानांचा सामना करण्याची ताकद असून ही हेलिकॉप्टर्स शत्रूंना सहजपणे चकमा देऊ शकतात, असेही ते पुढे म्हणाले. अतिउंचीच्या प्रदेशात शत्रूचे लक्ष्य, रणगाडे, बंकर, ड्रोन आणि इतर मालमत्तेवर मारा करण्यासाठी एलसीएच एक प्रभावी साधन असेल, असे लष्करी अधिकाऱयांनी सांगितले.

जोधपूर सीमेवर तैनात

भारतीय सैन्यदलात लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टरची पहिली बॅच दाखल झाली आहे. या अंतर्गत एकूण 10 एलसीएच हेलिकॉप्टर सैन्य दलात सामील करण्यात येतील.   सध्या पहिल्या टप्प्यात दाखल झालेली ही हेलिकॉप्टर जोधपूर सीमेजवळ तैनात करण्यात आली आहेत. 1999 मध्ये कारगिल युद्धादरम्यान या भारताला हल्ला करण्यासाठीच्या म्हणजे हल्ला करणाऱया हेलिकॉप्टरची गरज भासू लागली होती. त्यानंतर ‘एलसीएच’ हेलिकॉप्टर तयार करण्याची योजना आखण्यात आली होती. त्या काळात अशी हेलिकॉप्टर असती तर पर्वतांच्या माथ्यावर बसलेले पाकिस्तानी लष्कराचे बंकर लष्कराला उडवता आले असते. आता नजिकच्या काळात लष्कराकडून येत्या काळात आणखी हेलिकॉप्टर खरेदी करण्यात येतील.

ताकदवान आणि भक्कम

‘एलसीएच’ हेलिकॉप्टर ‘धनुष’ या 143 हेलिकॉप्टर युनिटमध्ये सामील करण्यात आली आहेत. ती भारतीय सैन्य आणि हवाई दलासाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहेत. शत्रूवर भेदक मारा करणारे हलक्मया वजनाचे ‘एलसीएच’ हेलिकॉप्टर पर्वतरांगांमध्ये सात युनिटमध्ये तैनात केले जातील. ‘एलसीएच’मध्ये दोन पायलट बसू शकतात. या हेलिकॉप्टरची लांबी 51.10 फूट आणि उंची 15.5 फूट आहे. याचे वजन 5,800 किलो आहे. हे हेलिकॉप्टर 268 किमी प्रतितास वेगाने उड्डाण करू शकते.

पाकिस्तानपासून संरक्षण करणार

‘एलसीएच’च्या जोधपूरच्या निवडीमागे अनेक कारणे आहेत, परंतु त्यापैकी सर्वात प्रमुख कारण पाकिस्तान सीमा आहे. वास्तविक, यूएस-निर्मित फायटर हेलिकॉप्टर अपाचेचे युनिट काश्मीर भागातील पठाणकोटमध्ये तैनात आहे. त्याचवेळी, लष्कराला यावषी जूनमध्ये मिळालेले लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टरचे युनिट चीन सीमेजवळ तैनात केले आहे. अशा परिस्थितीत पश्चिम सीमेवरील राजस्थानमध्ये लढाऊ हेलिकॉप्टरची कमतरता होती. राजस्थानमध्ये जोधपूर हा सर्वात जुना हवाईतळ आहे. त्यामुळे ‘एलसीएच’चे पहिले स्क्वॉड्रन जोधपूर येथे तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला. राजस्थानमध्ये स्क्वॉड्रन मिळाल्यानंतर अपाचे आणि एलसीएच या दोन्ही विमानांना सीमारेषा सहज कव्हर करता येणार आहेत.

Related Stories

मिझो भाषा जाणणारा मुख्य सचिव नेमा

Patil_p

महिला मुख्यमंत्री असताना असे घडते कसे?

Amit Kulkarni

जगण्याचा अधिकार त्यांनाही आहे ज्यांच्याकडे इंटरनेट नाही ; राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका

Archana Banage

लखीमपूर खेरी – सरकारने कचरु नये !

Patil_p

दाढी, टोपी, लुंगीवाल्यांचे सरकार येणार

Patil_p

उत्तराखंडात दिवसभरात 455 नवे कोरोना रुग्ण; 9 मृत्यू

Tousif Mujawar
error: Content is protected !!