सातारा प्रतिनिधी
दिशा समितीच्या सर्व सदस्यांनी आपापली गावे स्वयंपूर्ण करावीत. ज्या शासकीय योजना आहेत त्याची माहिती घ्यावी, अभ्यास करावा, अशी सूचना खासदार श्रीनिवास पाटील यांनी दिशा समितीच्या सदस्यांना केली. दिशा समितीच्या सदस्यांनी आपल्या भागातील समस्या जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात मांडाव्यात म्हणजे त्याचे निराकरण प्रशासन करेल अक्षु ही सूचना त्यांनी केली.
जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात दिशा समितीची बैठक पार पडली. या बैठकीला जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, प्रकल्प संचालक सुषमा देसाई यांच्यासह सदस्य ऍड. विनीत पाटील पाटील, राजाभाऊ काळे, किरण साबळे पाटील, सन्मिद्रा जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी ज्या विभागागाचे अधिकारी आले नव्हते त्यांना कारणे दाखवा नोटीस काढण्याच्या सूचना देण्यात आल्या. या बैठकीत रस्ते, अंगणवाडी, शिक्षण, वन, पशुसंवर्धन, कृषी, पुरवठा आदी विभागांचा आढावा घेण्यात आला.
मराठीत टिप्पणी द्या
पाटणचे राजाभाऊ काळे यांनी या बैठकीत दिलेली माहिती पुस्तिका ही इंग्रजीमध्ये आहे, प्रत्येक सदस्यांना मराठी येत, अभ्यास करायला ही सोपं जातं अशी विनंती केली. दरम्यान, त्यांनी पाटण कराड रस्त्याच्या कामावरून प्रशासनाला विचारणा केली.
शहरात महिला टॉयलेट नाहीत
नगरपालिका प्रशासन अधिकारी अभिजित बापट हे आढावा मांडत असताना समिन्द्रा जाधव यांनी आपण एवढे पुरस्कार घेतो आहोत. परंतु शहरात महिलांसाठी टॉयलेट नाहीत आम्ही पत्र ही सातारा पालिकेला दिले होते असा प्रश्न करताच बापट म्हणाले, पॊवई नाका यासह दोन ठिकाणी काम सुरु आहे. शहरात बांधण्यात येणार आहे, असे सांगितले. त्यावर खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले, महिला स्वच्छताग्रहाचे काम तातडीने करा आणि तेथे स्वच्छता कर्मचारी महिलाच असावी अशा सूचना दिल्या.