क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
दिल्ली येथे खेलो इंडिया स्पर्धेअंतर्गत खेलो मास्टर्स गेम्स ऍथलेटीक्स स्पर्धेत बेळगावच्या धोंडीराम शिंदे व सुरेश देवरमनी या दोन वयस्कर ऍथलीट्सनी 9 पदकांची कमाई करत घवघवीत यश संपादन केले.
दिल्लीतील ऍथलेटीक्स इनडोअर मैदानावर झालेल्या राष्ट्रीय खेलो मास्टर्स गेम्स ऍथलेटीक्स स्पर्धेत 75 वर्षावरील गटात हिंडलग्याचे धोंडिराम शिंदे यांनी 800 मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्ण, 200 मीटर व 400 मीटर शर्यतीत दोन कांस्यपदके पटकाविली.
70 वर्षावरील गटात उचगावच्या सुरेश देवरमनी यांनी 10 कि. मी. धावण्याच्या शर्यतीत रौप्य, 5 कि.मी. चालण्याच्या शर्यतीत सुवर्ण, 5 कि.मी. धावण्याच्या शर्यतीत कांस्य, 400 व 800 मी. धावण्याच्या शर्यतीत 2 रौप्यपदके पटकाविली. वयस्करांच्या फुटबॉल स्पर्धेत कर्नाटक संघाने विजेतेपद पटकाविले. त्यात सुरेश देवरमनी यांचा मोलाचा वाटा होता. या संघाला सुवर्णपदक देवून गौरविण्यात आले. या दोन्ही मास्टर्स ऍथलीट्सनी कर्नाटक संघाचे प्रतिनिधीत्व करताना बेळगावचे नावही उज्ज्वल केले आहे.