Tarun Bharat

जिह्यात पुढील दोन दिवस वादळी पावसाचे

प्रतिनिधी/ रत्नागिरी

पुढील दोन ते तीन दिवसात उत्तर व दक्षिण कोकणात विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट व सोसाटय़ाच्या वाऱयासह हलका ते मध्यम पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. त्यानुसार दक्षिण कोकणात 15 मार्च रोजी हलक्या ते मध्यम पावसासह 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. 16 मार्च रोजी दक्षिण कोकणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  या अंदाजानुसार पावसाने हजेरी लावल्यास आंब्यासह काजू पिकावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. वर्षाच्या सुरुवातीपासूनच वातावरण बदलाचा फटका झेलणाऱया जिह्यातील बागायतदार व शेतकऱयांसमोर यामुळे नवे संकट ओढवण्याची भिती व्यक्त होत आहे.

Related Stories

दिल्लीत हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद

datta jadhav

बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडले

datta jadhav

खरा इतिहास शिकवलाच गेला नाही !

Patil_p

भारताची सेवा निर्यात 322 अब्ज डॉलर्सच्या घरात

Patil_p

पंतप्रधान मोदींचे अमेरिकेला प्रयाण

Patil_p

रोममधील विख्यात रुग्णालयानं जारी केला ओमिक्रॉन विषाणूचा पहिला फोटो

Archana Banage
error: Content is protected !!