Tarun Bharat

पावसाळ्यात ट्राय करा कुरकुरीत मुगडाळ भजी

Advertisements

तरुणभारत ऑनलाइन

पावसाळ्याच्या थंड वातावरणात गरमागरम आणि कुरकुरीत ,चटपटीत खाण्याची फार इच्छा होते.आणि या दिवसात प्रत्येक घरात हमखास तयार केला जाणार पदार्थ म्हणजे भजी. कांदा,बटाटा आणि मिरची भजी तर आपण नेहमीच खातो. पण आज आम्ही तुम्हाला आज मूग डाळीची भजी कशी तयार करायची याची रेसिपी सांगणार आहोत.संध्याकाळच्या नाश्त्यामध्येही मूग डाळीच्या भजीवर तुम्ही ताव मारू शकता.त्याचबरोबर ही भजी जास्त तेलकटही नसते त्यामुळे तुमच्या डायटलाही ही भजी चालू शकते.चला तर मग पाहूया मूग डाळीच्या भजीची रेसिपी.

साहित्य:

१ वाटी मूग डाळ
१/२ चमचा लसूूण पेस्ट
१/२ चमचा आल्याची पेस्ट
२ हिरव्या मिरच्या
१ बारीक चिरलेला कांदा
मीठ
कोथंबीर
1 चमचे जिरे
तेल

कृती :

एका बाउलमध्ये मूग डाळ अंदाजे तीन ते चार तास भिजत ठेवावी. यानंतर भिजलेली मूग डाळ मिक्सर मध्ये जाडसर वाटून घ्यावी. त्यात दोन मिरच्या,आले आणि लसूणची पेस्ट मिक्स करावी. जर पीठ जास्त घट्ट झाले असेल तर गरजेनुसार त्यात थोडे पाणी घालावे. भजीचे पीठ तयार झाल्यानंतर त्यामध्ये कापलेला कांदा, कोथिंबीर, मीठ, जिरे ही सामग्री मिक्स करून घ्या. आता भजीच्या पिठामध्ये अर्धा चमचा तेल मिक्स करा आणि सर्व सामग्री चांगल्या पद्धतीने एकजीव करून घ्यावी.यानंतर भजी तळण्यासाठी पॅनमध्ये तेल गरम करा. आणि तेल गरम झाल्यानंतर भजी तळा.तयार झालेल्या कुरकुरीत आणि टेस्टी भज्यांचा आस्वाद तुम्ही हिरव्या चटणीसोबत किंवा सॉससोबत घेऊ शकता.

Related Stories

दम पनीर

Omkar B

मटण दम बिर्याणी

tarunbharat

बदामी पनीर

tarunbharat

गार्लिक रस्सम

Omkar B

वरी खिचडी

Omkar B

थंडगार गुलाब फिरनी

Omkar B
error: Content is protected !!