ऑनलाईन टीम/तरुण भारत
शिवसेनेतील आमदारांनी जी बंडखोरी केली त्याचे मुख्य कारण म्हणजे संजय राऊत. बंडखोरीच्या पहिल्या दिवसांपासून संजय राऊत यांची वक्तव्य आणि त्यांनी केलेली टोकाची टिप्पणी यामुळेच ही परस्थिती ओढावल्याचे बंडखोर आमदार बोलत आहेत. हे बंड यशस्वी झाल्यानंतर आता शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Dipak Kesarkar) यांनी संजय राऊतांवर निशाणा साधायला सुरुवात केली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत हे शरीराने शिवसेनेत आणि मनाने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असल्याची टीका केसरकर यांनी केली आहे.
यादरम्यान, शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर आणि संजय राऊत यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक सुरु आहे. शिवसेनेशी एकनिष्ठ असल्याचे सांगणारे राऊत हे शरीराने शिवसेनेत तर मनाने राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये असल्याचा आरोप दीपक केसरकर (Dipak Kesarkar) यांनी केला आहे. या एकमेकांवरील आरोप प्रत्यारोप यामुळे शिंदे गट आणि शिवसेनेतील अंतर वाढत चालले आहे. आम्ही नरेंद्र मोदी, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांचा चेहरा घेऊन जनतेसमोर गेलो होतो. यामध्ये कुणाचाही संबंध नसल्याचे म्हणत संजय राऊत यांना दीपक केसरकर यांनी फटकारले आहे.
माध्यमांशी बोलताना केसरकर म्हणाले की, “माझं असं मत आहे की, संजय राऊत हे शिवसेनेचे प्रवक्ते असले तरी ते शरीराने शिवसेनेत आणि मनाने राष्ट्रवादीत आहेत. त्यामुळे ते असं बोलतात. हे माझं मत आहे. ते खरं आहे की खोटं, हे मला माहीत नाही. ही काही टीका नाहीये, पण ज्याप्रमाणे ते वर्तन करत आहेत. त्यांनी पुढे जाऊन असं वर्तन करून नये.”
शिंदे गट आणि शिवसेनेतील अंतर हे आता अधिक वाढत आहे. आम्ही नरेंद्र मोदी, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांचा चेहरा घेऊन जनतेसमोर गेलो होतो. यामध्ये कुणाचाही संबंध नसल्याचे म्हणत केसरकरांनी संजय राऊत यांना फटकारले आहे.