Tarun Bharat

सहाव्या सत्रात शेअरबाजार नव्या उंचीवर

सेन्सेक्स 177 अंकांच्या वधारासह बंद, आयटी समभाग चमकले

वृत्तसंस्था/ मुंबई

आठवडय़ाच्या दुसऱया दिवशी मंगळवारी भारतीय शेअर बाजाराने पुन्हा एकदा नव्या उंचीवर झेपावत बंद होण्यात यश मिळवले आहे. सलग सहाव्या सत्रामध्ये सेन्सेक्स व निफ्टी नव्या उच्चांकावर बंद झाले. आयटी व एफएमसीजी क्षेत्रातील समभागांच्या कामगिरीवर दोन्ही निर्देशांक मजबुतीसह कार्यरत होते.

मंगळवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 177 अंकांच्या वाढीसह 62,682 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 55 अंकांच्या वाढीसह 18618 अंकांवर बंद झाला होता. दोन्ही निर्देशांकांनी नवी विक्रमी झेप घेतली होती. निफ्टीचा निर्देशांक दिवसाच्या सत्रामध्ये 18,678 अंकांपर्यंत पोहोचला होता. हिंदुस्थान युनिलिव्हर, सनफार्मा, नेस्ले, डॉ. रेड्डीज लॅब्ज, टाटा स्टील आणि आयसीआयसीआय बँक यांचे समभाग मात्र दमदार तेजीसह बंद झाले होते. हे समभाग जवळपास 1 ते 4 टक्के इतके तेजी गाठताना दिसत होते. यासोबत टायटन, एचसीएल टेक, आयटीसी, अल्ट्राटेक सिमेंट, एचडीएफसी आणि इन्फोसिस यांचेही समभाग तेजीसह दर्शवत होते. दुसरीकडे इंडसइंड बँक, बजाज फिनसर्व्ह, मारुती सुझुकी, पॉवरग्रीड कॉर्प, बजाज फायनान्स, लार्सन टुब्रो आणि एशियन पेंटस् यांचे समभाग मात्र घसरणीसह बंद झाले. क्षेत्रांच्या निर्देशांकांचा विचार करता एफएमसीजी क्षेत्राचा निर्देशांक सर्वाधिक वधारताना पाहायला मिळाला. एफएमसीजी क्षेत्राचा निर्देशांक 1.87 टक्के तर निफ्टीतला धातू निर्देशांक 1.03 इतका वधारताना दिसला. वित्तसेवा व फार्मा निर्देशांकदेखील मजबुती दर्शवत बंद झाला.

जागतिक बाजारात मात्र अमेरिकेतील बाजार वगळता युरोपियन व आशियाई बाजारांनी तेजी दाखवली. डो जोन्स आणि नॅसडॅक हे अमेरिकेतील बाजार घसरणीत व्यवहार करत होते. आशियाई बाजारामध्ये हँगसेंग 900 अंक, कोस्पी 25 अंक, शांघाई कम्पोझिट 71 अंकांनी वधारत व्यवहार करत होता.

Related Stories

आरोग्य संकल्प चांगले पण अंमलबजावणी हवी

Patil_p

कुणालाही न आवरणारे मन हे सद्गुरूला मात्र भीत असते

Amit Kulkarni

खासदार संख्या वाढणार

Patil_p

उत्सवी बेफिकिरी नकोय

Patil_p

मोदींच्या वाढदिवसाने देशाचे चांगभले?

Patil_p

गोवा आयआयटी सांकवाळचा पठार पर्याय ठरू शकतो

Patil_p