Tarun Bharat

केंद्रीय विद्यालय 2 च्या वार्षिक क्रीडास्पर्धा उत्साहात

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव

कॅम्प येथील केंद्रीय विद्यालय 2 स्कूलच्या 40 व्या वार्षिक क्रीडास्पर्धा मोठय़ा उत्साहात पार पडल्या. केव्ही 2 स्कूलच्या मैदानावर आयोजित केलेल्या वार्षिक क्रीडास्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी कमांडेट एमएलआयआरसीचे ब्रिगेडियर जयदिप मुखर्जी, मुख्याध्यापक एस. श्रीनिवास राजा आदी उपस्थित होते. प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते क्रीडाध्वजारोहन करण्यात आले. स्कूलचे 4 गट गंगा, यमुना, कृष्णा, कावेरी गटाच्या विद्यार्थ्यांनी पथसंचलन करुन पाहुण्यांना मानवंदना दिली. राष्ट्रीय स्पर्धेत चमक दाखविलेल्या खेळाडूंनी क्रीडाज्योत मैदानाभोवती फिरवून पाहुण्यांकडे सूपुर्द केली. यावेळी विद्यार्थ्यांनी कवायत, शारीरिक व्यायाम व इतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. पाहुण्यांच्या हस्ते आकाशात रंगीबेरंगी फुगे सोडून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी खेळाडूना मार्गदर्शन करुन शुभेच्छा दिल्या. जी. के. विनाग्याम यांनी आभार मानले. यावेळी प्राध्यापक वर्ग, शिक्षकवर्ग, पालक उपस्थित होते.

Related Stories

रिटेल फार्मसी असोसिएशनतर्फे कोविड केअर सेंटरला औषध पुरवठा

Patil_p

खंजर गल्लीतील कचऱयाची उचल वेळेत करा

Amit Kulkarni

निडगल येथील ‘त्या’ फरशी कारखान्यावर कारवाई करा

Omkar B

मुंगेत्री नदीच्या पाणी पातळीत वाढ

Amit Kulkarni

शिवसेना कार्यालयाकडे ‘ते’ कार्यकर्ते फिरकलेच नाहीत

Omkar B

रेशनकार्डचे काम ठप्प; सर्वसामान्य नागरिक अडचणीत

Patil_p