Tarun Bharat

शिवराज हायस्कूलच्या वार्षिक क्रीडास्पर्धा उत्साहात

वार्ताहर /उचगाव

दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचालित शिवराज हायस्कूल बेनकनहळ्ळी येथे हायस्कूलचा वार्षिक क्रीडा महोत्सव स्कूलच्या क्रीडांगणावर उत्साहात पार पडल्या. या क्रीडास्पर्धांच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष नारायण पाटील होते.

प्रारंभी सर्व विद्यार्थ्यांनी पथसंचलन करून पाहुण्यांना मानवंदना दिली. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते युवा नेता विनय कदम यांच्या शुभहस्ते ध्वजारोहन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यानंतर जिल्हास्तरीय खेळलेल्या खेळाडूंच्या हस्ते क्रीडाज्योतीचे आगमन करण्यात आले. या क्रीडाज्योतीचा स्वीकार डॉ. राजू पाटील आणि मदन पाटील यांनी केला. यानंतर वर्षा मंडलिक या विद्यार्थिनींने सर्व खेळाडूंना शपथ देऊ केली. प्रारंभी विद्यार्थिनींनी आपल्या सुमधुर आवाजात स्फूर्तीगीत व स्वागतगीत गाऊन पाहुण्यांचे स्वागत केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक पी. आर. पाटील यांनी केले. यानंतर मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीचे पूजन बाळू देसुरकर यांनी व खेळाच्या साहित्याचे पूजन रोटरी क्लब ऑफ वेणूग्रामचे माजी अध्यक्ष डी. बी. पाटील यांनी केले. देवाप्पा देसुरकर व बाबाजी देसुरकर यांच्या शुभहस्ते आकाशात कबुतरे सोडून या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

  स्पर्धांच्या उद्घाटनाच्या अनुषंगाने ध्वजारोहनाचे प्रमुख पाहुणे विनय कदम यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या प्रामाणिक खेळाचे प्रदर्शन मैदानावर दाखवावी, असे सांगून हायस्कूलच्या विकास कामासाठी आर्थिक मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली.

रोटेरियन डी. बी. पाटील यांनी विद्यार्थ्यांनी जय-पराजय याचा विचार न करता आपल्यामधील खेळाडूवृत्ती जागृत करून विजय होण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा, असे सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

मदन पाटील, डॉ. राजू पाटील व इतर मान्यवरांची स्पर्धकांना प्रोत्साहित करणारी भाषणे झाली. हायस्कूलचे क्रीडा शिक्षक आर. एन. पाटील यांनी स्पर्धेचा अहवाल व सर्व खेळांचे नियम सांगून स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्याचे आवाहन केले. अध्यक्षीय समारोप करताना नारायण पाटील यांनी हायस्कूलमधील शिक्षक वर्गाने विद्यार्थ्यांचे सर्वांगीण हित नजरेसमोर ठेवून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी क्रीडास्पर्धासारखे अनेक उपक्रम सुरू केलेले आहेत. विद्यार्थ्यांनी त्याचा फायदा घेऊन स्वत:चा व शाळेचा लौकिक वाढवावा, असे आवाहन केले. सूत्रसंचालन श्रीमती आर. ए. परब आणि एस. एम. पाटील यांनी केले. तर आभार प्रदर्शन बी. पी. काटकर यांनी केले. यावेळी शाळा सुधारणा कमिटीचे सर्व सदस्य, माजी विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Stories

अतिवृष्टीची शक्यता, संभाव्य पूरस्थितीसंदर्भात सतर्कतेची सूचना

Amit Kulkarni

शहापूर काकेरू चौकातील खोदकाम धोकादायक

Patil_p

व्हीटीयू सुरू करणार तीन नवीन अभ्यासक्रम

Patil_p

भावकेश्वरी देवस्थान उत्सव आजपासून

Patil_p

गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा…!

Amit Kulkarni

नगर परिषद, नगरपंचायतींच्या आरक्षणावरील स्थगिती मागे

Patil_p