Tarun Bharat

वास्कोत मालवाहू ट्रकचा ब्रेक निकामी झाल्याने तीन वाहनांना ठोकरले

प्रतिनिधी /वास्को

वाडे वास्कोतील महामार्गावर मालवाहू ट्रकचा ब्रेक निकामी झाल्याने घडलेल्या गंभीर अपघातात तीन गाडय़ांचे नुकसान झाले. एका कारला ट्रकने ठोकरून जवळपास तीस मिटर अंतरापर्यंत फरफटत नेले. सुदैवाने या कारमधील पती पत्नी सुखरूप बचावल्या.

वाडे वास्कोतील फ्लोरा ग्रॅण्ड हॉटेलसमोर मंगळवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास हा अपघात घडला. चिखलीहून वास्को शहराच्या दिशेने येणाऱया मालवाहू ट्रकचा ब्रेक निकामी झाल्याने ट्रक चालकाने ट्रक थांबण्याच्या प्रयत्नात हॉटेलच्या बाहेर रस्त्यावर पार्क केलेल्या दोन कारगाडय़ाला ठोकरले. पुढे जाताना मारूती 800 कार या ट्रकच्या तडाख्यात सापडली. या ट्रकने त्या कारला जवळपास तीस मिटर अंतरापर्यंत फरफटत नेले. यात कारची बरीच हानी झाली. मात्र, सुदैवाने या कारमधील पती पत्नी कोणत्याही गंभीर जखमांविना बचावली. अपघाताचा मोठा आवाज झाल्याने जवळपास लोक धावत आले. पोलीसही घटनास्थळी दाखल झाले व अपघाताचा पंचनामा केला. आपल्या सुरक्षेसाठी ट्रकमध्येच राहिलेल्या ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात घडल्याची कबुली त्याने दिली आहे. हा ट्रक मुरगाव बंदरातून मालवाहतुक करणारा आहे. पोलिसांनी तो ताब्यात घेतला आहे.

वाडेतील हॉटेलजवळ अपघातांचा धोका वाढला

वाडे वास्कोतील हमरस्त्यावर असलेल्या फ्लोरा ग्रण्ड या हॉटेलबाहेर रस्त्याच्या दोन्ही बाजुने मोठय़ा संख्येने वाहने पार्क करण्यात येतात. या हॉटेलमध्ये अनेक समारंभ होत असतात. अशा वेळी रस्त्याच्या दोन्ही बाजुनी तासंतास दाट पार्किंग होते. त्यामुळे सुरळीत वाहतुकीत अडचणी येत असतात. अशाच पार्क केलेल्या वाहनांना मालवाहू ट्रकने ठोकरले. यापूर्वीही या महामार्गावर मालवाहू ट्रकने अनेक वाहनांना ठोकरून नुकसान केले होते. मुरगाव बंदरात येणाऱया जाणाऱया मालवाहून वाहनांकडून त्यांच्या जीर्ण अवस्थेमुळे व काही वेळा चालकांच्या नशापानामुळेही असे अपघात वास्कोतील रस्त्यांवर रात्रीच्या वेळी घडत असतात. प्रसंगी एखादय़ाचा जीव अशा अपघात जाऊ शकतो. रात्रीच्या वेळी या मुख्य रस्त्यावरून ये जा करणाऱया मालवाहू वाहनांवर कडक नियंत्रण ठेवण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.

Related Stories

भेटण्यासाठी बोलावूनही पर्यटन संचालक जीवरक्षकांना ठेवले तिष्ठत

Patil_p

मीडफिल्डर एदू बेडिया एफसी गोवाला आणखी एक हंगामासाठी

Amit Kulkarni

बेंगलोर एफसीने रोखले एफसी गोवाला बरोबरीत

Amit Kulkarni

स्वातंत्र्यसैनिक, पूर्वजांच्या बलिदानावर देश उभा

Amit Kulkarni

केरीत 1.20 कोटीचे गांजा घबाड जप्त

Patil_p

मडगाव पालिका 25 लाख खर्चून नाले, गटारांची सफाई करणार

Omkar B
error: Content is protected !!