Tarun Bharat

निवडणुकीच्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी कामाला लागावे

पुणे / प्रतिनिधी :

मागच्या अनेक महिन्यांपासून महापालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समितीच्या निवडणुका झालेल्या नाहीत. मात्र, या निवडणुका येत्या मे महिन्यात लागू शकतात. त्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, अशा सूचना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी येथे दिली.

पुणे जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष आणि ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांसोबत शरद पवार यांनी संवाद साधला. त्या वेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. पवार म्हणाले, निवडणुकीच्या दृष्टीकोनात सर्वच पक्ष तयारी करीत असतात. महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार, याकडे सर्वांचेच लक्ष आहे. या निवडणुका येत्या मे महिन्यात होऊ शकतात. त्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी सज्ज रहायला हवे.

अधिक वाचा : …त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज धर्मवीरच

दरम्यान, बैठकीत कार्यकर्त्यांनी पवार यांच्यापुढे तक्रारींचा पाढा वाचला. गटबाजीमुळे वेल्हे ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचा पराभव झाला, अशी नाराजीही पवारांसमोर व्यक्त करण्यात आली. पक्षातील गटतट दूर झाले, तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत आपलीच सत्ता येईल, असेही कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले.

भोर-वेल्ह्याची सूत्रे अजितदादांकडे देण्याची सूचना

आघाडीचा धर्म असताना काँग्रेस आमदार लक्ष देत नाहीत. भोर वेल्हा मुळशी तालुका अजितदादांकडे द्या. सुप्रियाताई सगळय़ांना समजूतदारपणा दाखवतात. पण दादा सगळय़ांना ओळखून आहेत. ते सगळय़ांना नीट करतील, अशी सूचनाही एका कार्यकर्त्यांने पवारांना उद्देशून केली. आगामी महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांसाठी सर्व पक्षांनी आपली कंबर कसली आहे. त्यात आता राष्ट्रवादीनेही जोर लावल्याचे पहायला मिळत असून, पवार यांनी पक्ष संघटना मजबूतीकरणाकडे लक्ष देण्याच्या सूचना पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.

Related Stories

‘या’ ग्रामपंचायतीला मिळाला शिंदे गटाचा पहिला सरपंच

datta jadhav

SSC Result 2021 Maharashtra Board: ‘या’ वेबसाईटवर पाहता येणार दहावीचा निकाल

Archana Banage

ग्रामीण भारत कर्जबाजारी होतोय; 50 टक्क्यांहून अधिक कृषी कुटुंबांवर कर्जाचा बोजा

Archana Banage

‘त्या’ 12 आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन

datta jadhav

‘सबसे बडा खिलाडी’ दहा वर्षांनंतर पुणे पालिकेत

datta jadhav

मंत्री मुश्रीफांचा सोमय्यावर 100 कोटीचा दावा

Archana Banage