विशाल कदम/ सातारा
प्रत्येक गावामध्ये घनकचरा प्रकल्प असावा असा प्रयत्न सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांचा मानस आहे. त्यादृष्टीने जिल्हा परिषदेच्या स्वच्छता विभागाच्यावतीने जास्तीत जास्त गावांमध्ये सुऊ आहे. आतापर्यंत जिह्यातील 1499 गावांपैकी 1100 गावांचा प्रस्ताव आल्याने 534 गावांमध्ये प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. ज्या गावांमध्ये घनकचरा प्रकल्पास जागा नाही तेथे जागा कशा पद्धतीने उपलब्ध करता येईल यादृष्टीने प्रयत्न सुऊ आहेत. नुकत्याच झालेल्या ठराव समितीच्या बैठकीत सातारा तालुक्यातील देगाव येथे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी आणि जावली तालुक्यातील काळोशी या गावाला प्लास्टिक निर्मूलन जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला.
स्वच्छ भारत अभियानात सातारा जिह्याचे कामकाज चांगले सुऊ आहे. हे काम आणखी चांगले कसे करता येईल. यासाठी सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांच्यावतीने सकारात्मक प्रतिसाद असतो. स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी किरण सायमोते यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या विभागातील सर्वच कर्मचारी गावोगावी जावून चांगल्या पद्धतीने स्वच्छ भारत अभियानाचा टप्पा क्रमांक 2 कसा प्रभावीपणे राबवता येईल यासाठी प्रयत्न करत आहेत. गावोगावी आता स्वच्छतेचे महत्व पटू लागले आहे. त्यामुळे गावागावात घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प साकारण्यासाठी प्रत्येक गावांकडून मागणी होताना दिसत आहे. शासन पातळीवऊन त्या त्या गावांना अनुदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न राहिला आहे. जिह्यातील 1100 गावांना घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास मंजुरी देण्यात आली होती. त्यापैकी जिह्यातील निम्मे प्रकल्प मार्गी लागले आहेत. पूर्णत्वाला गेलेल्या 534 प्रकल्पांना त्या त्या तालुक्याच्या गटविकास अधिकाऱ्यांनी भेटी देऊन पाहणी केली आहे. तसेच ज्या गावांना प्लास्टिक कचरा व्यवस्थापन प्रकल्प उभा करायचा आहे त्यांनाही सहकार्य केले जात आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या ठराव समितीच्या सभेत जावली तालुक्यातील काळोशी प्लास्टिक कचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यासाठी जागेला मान्यता देण्यात आली आहे.
ग्रामपंचायतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावे असलेली गट क्रमांक 113/1/अ मधील 0.67 हेक्टर क्षेत्रापैकी 0.20 हेक्टर आर जागा देण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे दिला होता. जागा हस्तांतरणाबाबत काळोशी ग्रामपंचायतीने मासिक सभा दि. 24 नोव्हेंबर 2022 चा ठराव क्रमांक 13 व ग्रामसभा दि. 18 नोव्हेंबर 2022 चा ठराव क्रमांक 6 नुसार मान्यता दिलेली आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेनेही मान्यता दिलेली आहे. तसेच सातारा तालुक्यातील देगाव येथेही जिल्हा परिषदेच्या मालकीचे जागा शेतकी शाळा येथे असून गट नंबर 7 मध्ये 1 हेक्टर 88 आर इतके क्षेत्र आहे. हे क्षेत्र प्राथमिक शिक्षण विभागाच्या कब्जात आहे. देगाव ग्रामपंचायतीने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत टप्पा क्रमांक 2 मध्ये घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यासाठी ग्रामपंचायतीच्या मालकीची जागा नसल्याने त्या जागेतील 10 गुंठे जागा मागितली आहे. त्यांच्या मागणीनुसार देगाव ग्रामपंचायतीला स्वच्छ भारत मिशन टप्पा क्रमांक 2 अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प राबवण्यासाठी ग्रामपंचायत मालकीची जागा उपलब्ध नसल्याने देगाव येथील गट नंबर 7 शेतकी शाळा मधील एकूण क्षेत्र 1 हेक्टर 88 आर पैकी 10 गुंठे क्षेत्र अटीवर देण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्या अटी 10 गुंठे क्षेत्रावर घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प राबवणे बंधनकारक राहिल. त्या जागेची मालकी जिल्हा परिषदेच्या शेतकी शाळा म्हणून कायम राहिल. जागेचा वापर ग्रामपंचायतीस अन्य कारणासाठी करता येणार नाही. नागरी घनकचरा हाताळणी व व्यवस्थापन नियमातील तरतुदीनुसार आवश्यक त्या परवानग्या, ना घेणे बंधनकारक राहिल, अशा अटीमुळे आता देगाव आणि काळोशी येथे प्रकल्प उभे राहण्याची शक्यता आहे.