पोलीस अधिकाऱयांचा दावा ः धार्मिक द्वेषातून कृत्य केल्याचाही संशय
टोकियो / वृत्तसंस्था
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या हत्या प्रकरणात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. माजी पंतप्रधान आबे यांच्या सुरक्षाव्यवस्थेत काही त्रुटी असण्याची शक्मयता असल्याचा दावा केला जात आहे. तसेच दुसरीकडे धार्मिक संघटनेच्या द्वेषातून त्यांची हत्या झाल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे. शिंजो आबे यांच्यावर 8 जुलै रोजी प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. नारा शहरातील निवडणूक प्रचारावेळी गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आली होती.
माजी पंतप्रधान असलेल्या आबे यांना पुरेशी सुरक्षा पुरवली गेली होती का, याविषयी आता उपस्थित केले जात आहेत. आबे सभास्थळी भाषण देत असताना त्यांच्याभोवती फार कमी सुरक्षारक्षक तैनात असल्याचे दिसत आहे. तसेच हल्लेखोर त्यांच्या अगदी जवळपर्यंत पोहोचल्याने सुरक्षेच्या मुद्दय़ाचीच समाजमाध्यमे आणि वृत्तवाहिन्यांवर अधिक चर्चा सुरू आहे. तसेच माजी पोलीस अधिकारी फुमिकाजू हिगुची यांनीही आबे यांची सुरक्षाव्यवस्था अपुरी असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर यामागामी याला आबे यांच्या पाठीमागे कसे जाऊ दिले, याची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली. नारा शहराचे पोलीसप्रमुख तुमोआकी ओनिजुका यांनीही आबे यांच्या सुरक्षाव्यवस्थेत काही समस्या असल्याची शक्मयता नाकारता येणार नाही, असे म्हटले आहे.
शिंजो आबे यांच्या हत्येच्या घटनेमुळे संपूर्ण जपानाला धक्का बसला आहे. 41 वषीय हल्लेखोर तेत्सुया यामागामी याचा एका धार्मिक संस्थेवर रोष होता. सदर संस्था शिंजो आबे यांच्याशी संबंधित असल्याने द्वेषातूनच त्याने आबे यांचा प्राण घेतल्याची चर्चाही जपानमध्ये सुरू आहे.