आमच्या सदिच्छा सदैव तुमच्यासोबत; आ.राणेंनी दिल्या मडकईकर कुटुंबीयांना शुभेच्छा
सावंतवाडी व कुडाळ येथील सुप्रसिद्ध सुवर्णकार ‘मडकईकर ज्वेलर्स ‘ च्या १ ग्रॅम गोल्ड दागिन्यांच्या नव्या दालनाचा शुभारंभ आमदार नितेश राणे यांच्या हस्ते झाला. यापुढेही अशीच प्रगती करीत रहा, आमच्या सदिच्छा तुमच्यासोबत सदैव आहेत, अशा शब्दांत आ. नितेश राणे यांनी मडकईकर कुटुंबीयांना शुभेच्छा दिल्या.सावंतवाडी उभाबाजार येथील रघुनाथ मार्केट समोर वातानुकूलित अशा दालन सुरू झाले. आ. नितेश राणेंच्या हस्ते दीप्रज्वलन करून व फीत कापून दालनाचा शुभारंभ झाला. यावेळी समस्त मडकईकर कुटुंब, भाजपचे पदाधिकारी, व सावंतवाडीतील अन्य मान्यवर उपस्थित होते.