प्रतिनिधी /बेळगाव
जायंट्समध्ये ‘जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव प्राईड सहेली’ ही नवीन संघटना जोडली जात आहे. या संघटनेने समाजसेवा व स्वतःसाठी जगा हे ब्रिद स्वीकारले आहे. दि. 1 जून रोजी दुपारी 4 वाजता हिंद सोशल क्लबच्या हॉलमध्ये नूतन पदाधिकाऱयांचा अधिकारग्रहण समारंभ होणार आहे. याप्रसंगी हुबळी फेडरेशनच्या अध्यक्षा तारादेवी वाली, सेंट्रल कमिटी सदस्य दिनकर अमिन उपस्थित राहणार आहेत.
सहेलीच्या नूतन अध्यक्षा म्हणून आरती शहा यांची निवड झाली आहे. त्या बीकॉम असून चितळे ग्रुप बेळगावच्या वितरक आहेत. उपाध्यक्षा स्नेहल शहा या गुजराती सखी मंडळामध्ये असून जैन जागृती संघटनेच्या अध्यक्षा आहेत. जलाशय फौंडेशनतर्फे त्या सामाजिक उपक्रम राबवितात.
दुसऱया उपाध्यक्षा रश्मी पाटील या सौंदर्य तज्ञ आहेत. सचिव जिग्ना शहा यांचे शिक्षण मुंबई येथे झाले असून त्यांचे अनेक भाषांवर प्रभुत्व आहे. खजिनदारपदी मोनाली शहा यांची निवड झाली आहे.