प्रतिनिधी /वास्को
वरूणापुरी वास्को येथे भारतीय नौदलाच्या वरिष्ठ खलाशांसाठी बांधलेल्या नवीन 245 घरांच्या प्रकल्पाचे उद्घाटन गुरूवारी व्हाईस ऍडमिरल अजेंद्र बहादूर सिंग यांच्याहस्ते करण्यात आले. सात नवीन इमारती कार्यान्वित झाल्यामुळे गोव्यात नियुक्त केलेल्या नौदलाच्या वरिष्ठ खलाशांसाठी सोय झाली आहे.
गेल्या वर्षी त्रिशूल पर्वतारोहण मोहिमेदरम्यान प्राणांची आहुती दिलेल्या भारतीय नौदलाच्या वीरांची नावे या इमारतींना देण्यात आलेली आहेत. या शूरवीरांच्या नातेवाईकांनाही या कार्यक्रमाला आमंत्रीत करण्यात आले आणि त्यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला. नेव्ही वाईव्हस वेल्फेअर असोसिएन (पश्चिम क्षेत्र) च्या अध्यक्ष श्रीमती चारू सिंग यांच्याहस्ते पहिल्या सात घरांच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या.