Tarun Bharat

पशुसंगोपनच्या फिरत्या पशुचिकित्सालयाचे लोकार्पण

Advertisements

प्रतिनिधी / बेळगाव : जनावरांना वेळेत उपचार मिळावेत, यासाठी पशुसंजीवनी योजनेअंतर्गत सुरु करण्यात आलेल्या फिरत्या पशु चिकित्सालय वाहनांचे लोकार्पण शनिवारी पशुसंगोपन खात्याच्या आवारात झाले. खासदार मंगला अंगडी, जिल्हा उपनिर्देशक डॉ. राजीव कुलेर, डॉ. आनंद पाटील आदींच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून वाहनांना चालना देण्यात आली.

ग्रामीण आणि दुर्गम भागातील जनावरांना वेळेत आरोग्य उपचार उपलब्ध व्हावेत, यासाठी जिल्हय़ात 17 फिरती पशुवाहिका धावणार आहेत. त्यामुळे पशुपालकांच्या जनावरांना घरोघरी उपचार उपलब्ध होणार आहेत. बेळगाव, बैलहोंगल, रामदुर्ग, सौंदत्ती, गोकाक, मुडलगी आदी ठिकाणी धावणार्‍या फिरत्या पशुचिकित्सालय वाहनांचे शनिवारी लोकार्पण करण्यात आले. त्यामुळे आता गावोगावी जनावरांच्या उपचारासाठी फिरती पशुचिकित्सालये दिसणार आहेत. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी 1962 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आव्हाहन करण्यात आले आहे.

Related Stories

प्रलंबित कामांसाठी तातडीने प्रयत्न करण्यावर भर द्या

Omkar B

शिक्षक भरतीसाठी हलशीवाडी ग्रामस्थ आक्रमक

Amit Kulkarni

परिवहन तोटय़ात …बससेवा सुरूच

Patil_p

गोगटे पीयू कॉलेजचा 89 टक्के निकाल

Patil_p

दिवाळीत कोरोनाकडे दुर्लक्ष नको

Patil_p

शुभम शेळके यांना निवडून आणण्याचा धामणे येथे निर्धार

Amit Kulkarni
error: Content is protected !!