Tarun Bharat

बेळगाव-कोल्लम रेल्वेचा शुभारंभ

अय्यप्पा स्वामी भक्तांची सुविधा : दर रविवारी धावणार रेल्वे, भाविकांमधून समाधान

प्रतिनिधी /बेळगाव

शबरीमला येथील अय्यप्पा स्वामी मंदिराला भाविकांना जाता यावे, या उद्देशाने बेळगाव-कोल्लम या मार्गावर रविवारपासून विशेष रेल्वे सुरू करण्यात आली. रविवारी सकाळी बेळगाव रेल्वेस्थानकातून ही विशेष रेल्वे कोल्लमच्या दिशेने मार्गस्थ झाली. ‘पद्मश्री’ पुरस्कार प्राप्त तिम्मक्का यांच्या हस्ते या एक्स्प्रेसला हिरवा बावटा दाखविण्यात आला.

बेळगाव, मिरज, हुबळी, कोल्हापूर या परिसरात अय्यप्पा स्वामींचे अनेक भक्त आहेत. दरवषी मिळेल त्या वाहनाने हे भक्त शबरीमला येथे दर्शनासाठी जातात. त्यामुळे या मार्गावर विशेष रेल्वे सुरू करण्याची मागणी मागील अनेक दिवसांपासून होत होती. काही दिवसांपूर्वीच बेळगावच्या खासदार मंगला अंगडी यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे विशेष रेल्वे सोडण्याची मागणी केली होती. भाविकांची वाढती मागणी लक्षात घेऊन नैत्य रेल्वेने बेळगाव-कोल्लम या मार्गावर विशेष रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला.

20 नोव्हेंबर ते 15 जानेवारीपर्यंत प्रत्येक रविवारी बेळगावमधून ही विशेष रेल्वे कोल्लमच्या दिशेने रवाना होणार आहे. त्यामुळे बेळगावमधून शबरीमला व तेथे दर्शन घेऊन पुन्हा माघारी फिरणे भाविकांसाठी सोयीचे ठरणार आहे. रविवारी सकाळी 11.30 वाजता बेळगावमधून निघालेली एक्स्प्रेस सोमवारी दुपारी 3.15 वाजता कोल्लमला पोहोचेल. परतीच्या प्रवासात सोमवारी सायंकाळी 5.10 वाजता कोल्लम येथून निघणार असून मंगळवारी रात्री 11 वाजता बेळगावला पोहोचणार आहे.

रविवारी या विशेष रेल्वेचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. पद्मश्री पुरस्कार प्राप्त तिम्मक्का यांच्यासोबत खासदार मंगला अंगडी, आमदार अनिल बेनके यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. थेट रेल्वे सुरू झाल्याने शबरीमला भाविकांमधून रेल्वे तसेच लोकप्रतिनिधींचे आभार मानण्यात आले. यानिमित्त रेल्वेच्या इंजीनला फुलांची आरास करण्यात आली होती.

Related Stories

जिल्हाधिकाऱयांची कॅन्टोन्मेंटला भेट

Amit Kulkarni

श्री सिद्धेश्वर गो-शाळेचा शुभारंभ

Omkar B

अमलीपदार्थ बाळगल्याच्या आरोपातून 7 जण निर्दोष

Omkar B

जिल्हय़ात 31 नवे रुग्ण;17 जण कोरोनामुक्त

Amit Kulkarni

बलिदान मासाचे गांभीर्याने पालन करा

Amit Kulkarni

चिकोडीत वाहतूक कोंडी नित्याचीच

Omkar B