19 वी शाखा बेळगावमध्ये सुरू
प्रतिनिधी /बेळगाव
तब्बल 20 प्रकारच्या पुरणपोळय़ा आता बेळगावमध्ये उपलब्ध झाल्या आहेत. बेंगळूर येथील भास्कर्स ‘मने होळीगे कुरुक तिंडी’ या खाद्यपदार्थाच्या दालनाचे बुधवारी उद्घाटन झाले. नेहरूनगर येथील रामदेव हॉटेलनजीक सुखसागरसमोर हे दालन सुरू झाले असून, पहिल्याच दिवशी नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. खासदार मंगला अंगडी व आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते या दालनाचे उद्घाटन करण्यात आले.
सणासुदीच्या काळात पुरणपोळी केली जाते. परंतु भास्कर्स मने होळीगेमध्ये 20 प्रकारच्या पुरणपोळय़ा मिळतात. नारळ पुरणपोळी, डाळ, ड्रायपूट्स, खवा, खोबरे व साखर, गाजर, सुके खोबरे, शेंगा, शुगर फ्री, बदाम, अंजिर, चॉकलेट, आंबा, अननस या प्रकारांमध्ये पुरणपोळय़ा यापुढे बेळगावकरांना चाखता येणार आहेत. बेंगळूर, म्हैसूर, मंगळूर, मुंबईनंतर आता हे दालन बेळगावमध्येही सुरू झाले आहे. भास्कर्स हे मागील 20 वर्षांपासून पुरणपोळी व्यवसायात असून, 7 वर्षांपासून राज्यभर आऊटलेट सुरू असल्याचे संस्थापक भास्कर्स यांनी सांगितले.
खासदार मंगला अंगडी यांनी पुरणपोळीचा आस्वाद घेऊन भास्कर्स यांचे कौतुक केले. इतक्मया विविध प्रकारात पुरणपोळी केल्या जातात, हे मी पहिल्यांदाच पाहिल्याचे त्यांनी सांगितले. आमदार अनिल बेनके यांनी या दालनाला शुभेच्छा दिल्या. यावेळी उद्योजक हरिष व पूनम गुलबानी, कर्नाटक राज्य शीख संघटनेचे ओंकारसिंग भाटी, दालनाचे इन्चार्ज सुनील शिंदे यांसह इतर मान्यवर उपस्थित होते.
पहिल्याच दिवशी 3 हजार पुरणपोळय़ांची विक्री
भास्कर्स मने होळीगे दालनातर्फे उद्घाटन स्पेशल ऑफर देण्यात आली होती. केवळ 1 रुपयामध्ये स्वादिष्ट पुरणपोळी दिली जात असल्याने नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. विविध फ्लेवर्समध्ये पोळी खाण्यासाठी बेळगावकरांनी रांगा लावल्या. पहिल्या दिवशी अंदाजे 3 हजार पोळय़ांची विक्री झाल्याचे भास्कर्सतर्फे सांगण्यात आले.