मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने चालना
बेळगाव : सांबरा येथील बेळगाव विमानतळावर एव्हिएशन नागरी सप्ताहाचे सोमवारी उद्घाटन करण्यात आले. राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते या सप्ताहाचे उद्घाटन झाले. विमानतळावरील सुरक्षा तसेच प्रवाशांचा प्रवास सोयीचा व्हावा यासाठी हा सप्ताह साजरा केला जात आहे. उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री सतीश जारकीहोळी, महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, राज्याच्या मुख्य सचिव शालिनी रजनीश, आमदार राजू सेठ, माजी आमदार अंजली निंबाळकर तसेच जिल्ह्यातील आमदार व विमानतळाचे अधिकारी उपस्थित होते.