Tarun Bharat

Futuristic Classroom : गोरंबेत देशातील पहिल्या फ्युच्युरिस्टीक क्लासरूमचे लोकार्पण

आमदार हसन मुश्रीफ, माजी आमदार संजयबाबा घाटगे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांची उपस्थिती

Advertisements

कोल्हापूर/प्रतिनिधी

देशातील पहिल्या फ्युच्युरिस्टीक क्लासरूमचे कोल्हापूर जिल्ह्यातील गोरंबे (ता.कागल) येथे लोकार्पण उत्साहात लोकार्पण झाले. आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते, माजी आमदार संजयबाबा घाटगे यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. जिल्ह्यातील शिक्षकांची उपस्थिती, भावउत्कटता असणारे पालक व नाविन्यपूर्ण शिक्षण प्रणालीची आस असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने या सोहळ्याला आणखी उंची प्राप्त झाली होती.

यावेळी बोलताना आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, “शिक्षणक्षेत्रात तंत्रज्ञानाचा आटोकाट अवलंब होणे काळाची गरज आहे.” असे म्हणून शिक्षणक्रांतीमुळे केवळ पाच वर्षात देश महासत्ता बनेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. “शिक्षकांवर ज्ञानदानाची महत्त्वाची जबाबदारी आहे. उच्च विद्याभूषित पिढी घडल्यास देशाची आर्थिक प्रगती होणार आहे. प्राथमिक शाळांबद्दल असणारा नकारार्थी दृष्टिकोन कमी होवून या शाळातील पटसंख्या वाढली आहे.” आता ही पटसंख्या टिकविण्याची जबाबदारी शिक्षकांची असल्याचा सल्ला, आमदार मुश्रीफ यांनी दिला.

माजी आमदार संजयबाबा घाटगे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, “सरपंच शोभा शिवाजी पाटील यांच्या प्रयत्नातून गोरंबेसारख्या डोंगराळ खेडयात उच्च तंत्रज्ञानावर आधारित देशातील पहिली शिक्षणप्रणाली कार्यान्वित झाली. ही बाब अभिमानास्पद असून येथिल मुले अद्ययावत शिक्षण घेऊन जगाला आव्हिन द्यायला सज्ज होतील.”
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी शिक्षणात सर्वच पातळयांवर कोल्हापूर जिल्हा अग्रेसर आहेच. गोरंबे विद्यामंदिर या कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेची शैक्षणिक गरुडझेप कौतुकास्पद आणि निश्चितच अभिमानास्पदही आहे. अशी माहीती दिली.

गोकुळचे संचालक अमरिश घाटगे यांनी “गोरंबे विद्यामंदिर शाळेत साकारलेली देशातील पहिली फ्युचरिस्टिक क्लासरूम हे या गावाचे संघटित यश आहे. या नव्या अत्याधुनिक शिक्षणप्रणालीमुळे या गावात अधिकाधिक ज्ञानाधिष्टीत सक्षम पिढी निर्माण होईल, याचा विश्वास वाटतो.” असे मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमात फ्युचरिस्टिक क्लासरूम या संकल्पनेचे जनक, राष्ट्रपती पुरस्कार विजेते तंत्रस्नेही शिक्षक संदीप गुंड यांचा सत्कार आमदार हसन मुश्रीफ, माजी आमदार संजयबाबा घाटगे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाला. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने, शिक्षणाधिकारी आशा उबाळे, गटविकास अधिकारी सुशिल संसारे, गटशिक्षणाधिकारी डॉ. जी. बी. कमळकर, सरपंच शोभा पाटील यासह शिक्षक, ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Stories

राशिवडेत परप्रांतीय महिलेची आत्महत्या

Archana Banage

‘निधी’ची मागणी ‘जि.प’ करणार कधी?

Archana Banage

जय शंभुराजे परिवाराच्या मावळ्यांची मुडागडची स्वच्छता मोहीम

Archana Banage

कोल्हापूर : आयजीएम रुग्णालय लवकरच पूर्णक्षमतेने कार्यरत

Archana Banage

कोल्हापूर : गडहिंग्लजच्या उपनगराध्यक्षपदी महेश कोरी

Archana Banage

कोल्हापूर : आरळेतील मारहाण प्रकरणी संशयिताला १३ पर्यंत कोठडी

Archana Banage
error: Content is protected !!