Tarun Bharat

कल्लेहोळमध्ये क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

Advertisements

वार्ताहर /उचगाव

कल्लेहोळ येथील शिवप्रतिष्ठान यांच्यावतीने खास दसरोत्सवानिमित्त क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अध्यक्षस्थानी माजी ग्रा.पं. सदस्य सुभाष मरूचे होते. तालुका म. ए. समितीचे युवा नेते आर. एम. चौगुले यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन माजी महापौर व समितीचे नेते शिवाजी सुठंकर यांनी तर गणेश मूर्तीचे पूजन सौंदर्य पेंट्स्चे मालक व तालुका म. ए. समितीचे नेते आर. आय. पाटील यांनी केले. दीपप्रज्वलन माजी आमदार मनोहर किणेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

 यावेळी सोमनाथ शंकर मारुचे यांना कमांडोपद मिळविल्याबद्दल त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. या क्रिकेट स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी 10051 रुपये व चषक, द्वितीय क्रमांकासाठी 5051 रुपये व चषक तसेच अन्य बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

Related Stories

सुवर्ण सिंहासनाच्या संकल्पपूर्तीसाठी झटायला हवे

Amit Kulkarni

जोतिबा मंदिरात कटल्याचे जल्लोषात आगमन

Amit Kulkarni

मनपाकडून जाहिरात फलक हटविण्याची कारवाई

Amit Kulkarni

टिळकवाडी येथे रामनवमी साजरी

Amit Kulkarni

राकसकोप जलाशयाचे उघडले तीन दरवाजे

Amit Kulkarni

आरोग्य अधिकारी-पर्यावरण अभियंत्यांमध्ये वादाची दरी

Amit Kulkarni
error: Content is protected !!