क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
भरतेश एज्युकेशन ट्रस्ट आयोजित खेल का वज्रमहोत्सव – आंतरशालेय व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन मोठय़ा उत्साहात पार पडले.
या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कर्नाटक उत्तर पश्चिम शिक्षक मतदारसंघाचे आमदार आणि माजी मंत्री प्रकाश हुक्केरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुरेश पाटील, केएमएफ बेळगावचे संचालक आणि गुरुराज कल्याणशेट्टी, सीपीआय नेसरगी उपस्थित होते. आमदार प्रकाश हुक्केरी यांनी विशेषतः ग्रामीण भागातील खेळाडूंना चालना दिल्याबद्दल भरतेश संस्थेचे कौतुक केले. बीईटीच्या संस्थापकांपैकी एक असलेले स्व. कोमलअण्णा दोड्डण्णावर यांचे राजकीय गुरू असल्याबद्दल त्यांनी त्यांच्या सहवासाची आठवण करून दिली.
व्हॉलीबॉल मैदानावर नेटवरील चेंडूचे फित कापून व रोपटय़ाला पाणी देऊन मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. प्रकाश ह़ुक्केरी यांनी विजेत्या संघासाठी बक्षीसही जाहीर केले.
या प्रति÷sच्या स्पर्धेत जिल्हय़ातून एकूण 37 संघ- 25 मुलांचे संघ, 12 मुलींच्या संघांनी सहभाग घेतला होता. विजेत्या संघांना 40,000 रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. दोन दिवस चालणाऱया या कार्यक्रमासाठी श्रीपाल खेमलापुरे, विनोद दोड्डाण्णावर, हिराचंद कलमनी, शरद पाटील, प्राचार्य, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.