प्रतिनिधी /बेळगाव
फॅशनिस्टा आयोजित फॅशनव्या या प्रदर्शनाचे उद्घाटन रविवारी नेहरूनगर येथील केएलई सेंटनरी कन्व्हेंशन सेंटर येथे करण्यात आले. 21 व 22 ऑगस्टदरम्यान सकाळी 11 ते रात्री 9 या वेळेत प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार आहे. बेळगावमधील उद्योजिका दिव्या मेहता, तेजल खोडा, साहित्या दोड्डण्णावर, प्रतिभा घाडी, अनुजा क्षीरसागर, आशा यमकनमर्डी, सुषमा भट, प्राचार्या दिप्ती इंगळे, केएलई फॅशन इन्स्टिटय़ूटच्या प्राचार्या नमिता चक्हाण यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.
या प्रदर्शनात महिलांसाठी वस्त्रप्रावरणे, दागिने, सजावटीच्या वस्तु, सौंदर्य प्रसाधने, भेटवस्तु, पर्फ्युम, गृहोपयोगी साहित्य मांडण्यात आले आहे. मुंबई, दिल्ली, कोलकाता, जयपूर, अहमदाबाद, शिमोगा, भोपाळ, धारवाड, पुणे, आसाम, सूरत, हुबळी व बेळगाव येथील 20 हून अधिक
स्टॉल मांडण्यात आले आहेत. दिव्या चव्हाण यांनी महिलांसाठी साडी परिधान करण्याचा डेमो सादर केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फॅशनव्याचे समन्वयक अखिलेश पांडे व स्वाती जोग यांनी केले. प्रदर्शनामध्ये विविध प्रकारच्या साडय़ा, डेस, कुर्ता, जॅकेट, स्वेटर्स यासह महिलांचे डिझाईनर दागिने लक्षवेधी ठरत आहेत. पहिल्याच दिवशी प्रदर्शनाला महिलांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.