प्रतिनिधी /बेळगाव
जीएसएस महाविद्यालयामधील रसायनशास्त्र विभागातर्फे सर्टिफिकेट कोर्स ईन फौंड्री इंडस्ट्रीज या तीन महिन्यांच्या कोर्सचे उद्घाटन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक नितीन लांगडे उपस्थित होते. त्यांनी फौंड्री उद्योगाचा प्रवास व त्यातील बारकावे यावर मार्गदर्शन केले.
बेळगाव हे ऑटोमोबाईलच्या विश्वाचे महत्त्वाच्या स्थानी असून जगभरातील मोठमोठय़ा कंपन्यांना येथील साहित्याची विक्री केली जाते. हीच बाब लक्षात घेऊन जीएसएस महाविद्यालयाने हा कोर्स तयार केला आहे. त्याचा लाभ घ्या, असे आवाहन त्यांनी केले. यामध्ये 55 विद्यार्थ्यांनी आपली नावे नोंदविली आहेत. उद्घाटनप्रसंगी एसकेई सोसायटीचे उपाध्यक्ष व प्रा. एस. वाय. प्रभू, विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.