पणजी प्रतिनिधी
पर्यटनाला चालना देण्यासाठी गोव्याने विविध क्षेत्रात केलेल्या ऐतिहासिक प्रगती आणि विकासाची माहिती देणारा आणि गोव्याला उच्च शिखरावर नेणे या उद्देशाने नियोजित रोड शोची उत्तर प्रदेशातील पवित्र शहर वाराणसी येथे आज भव्य सुरुवात झाली.
माहिती संचालक दीपक बांदेकर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. उद्घाटन समारंभाला पर्यटन संचालक आणि जीटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक निखिल देसाई आयएएस, उत्तर प्रदेश पर्यटनाचे माहिती अधिकारी कीर्तीमान श्रीवास्तव, माहिती अधिकारी, प्रकाश एस. नाईक, श्री जीटीडीसीचे सरव्यवस्थापक लक्ष्मीकांत वायंगणकर, सहाय्यक पर्यटन अधिकारी श्री. मिलिंद चोडणकर, आणि जीटीडीसीचे मार्केटिंग व्यवस्थापक श्री. प्रविणकुमार फळदेसाई उपस्थित होते.
यावेळी बोलताना दीपक बांदेकर यांनी, गोवा पोर्तुगीज राजवटीपासून मुक्त झाल्याची 60 वर्षे साजरी करीत असल्याचे सांगितले. त्याचाच एक भाग म्हणून राज्य सरकारने विविध कार्यक्रम आणि उपक्रम राबविले आहेत. गोवा Ÿ60 या विषयावर असलेल्या या कार्यक्रमांचे आयोजन आता देशाच्या विविध भागात करण्यात येत असून राज्य सरकारने विविध क्षेत्रात केलेली नेत्रदिपक प्रगतीचे दर्शन घडविले आहे असेही त्यानी सांगितले.
भारतातील सहा शहरांमध्ये नियोजित रोड शोची मालिका अहमदाबादपासून सुरू झाली होती, त्यानंतर उदयपूर, राजस्थान आणि आता वाराणसीमध्ये संपन्न होत आहे.
23 सप्टेंबर 2022 पासून होणाऱया या तीन दिवसीय कार्यक्रमाच्या माध्यमातून गोव्याच्या स्वातंत्र्य लढय़ात सहभागी होण्यासाठी देशाच्या विविध भागातून गोव्यात आलेल्या स्वातंत्र्यसैनिक आणि हुतात्म्या?च्या अतुलनीय योगदानाबद्दल तसेच गोव्याला वसाहतवादी राजवटीतून मुक्त करण्यासाठी केलेल्या कार्याची लोकांना माहिती देण्याचा प्रयत्न केला जात आहे विशेषतः वाराणसीतील लोकांना गोव्याच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरा, पाककृती, आदरातिथ्य, वारसा आणि इतर क्षेत्रांची माहिती आणि अनुभव घेता यावा यासाठी गोव्यातील कलाकारांचे थेट सादरीकरण हे या कार्यक्रमाचे वैशिष्टय़ आहे.
गोव्यातील नेत्रदिपक उत्सवानंतर राज्य सरकारने गोवा Ÿ 60 विषय असलेली गोवा राज्याच्या स्वातंत्र्यानंतर विविध क्षेत्रांतील प्रचंड प्रगती व्यतिरिक्त राज्याच्या मुक्तीनंतरच्या बहुविध कामगिरीचे प्रदर्शन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सुशासनापासून ते क्रीडा, कला आणि संस्कृती, पर्यटन, शिक्षण, आरोग्य सेवा, गोव्यातील जीवनमान सुधारण्यासाठी आणि गोव्याला जागतिक नकाशावर नेण्यासाठी पायाभूत सुविधा आणि इतर अनेक क्षेत्रांना चालना देण्यासाठी अधिक पर्यटक आणि गुंतवणूकदारांना आकर्षित करणे यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे.