प्रतिनिधी / बेळगाव
गृहशोभा (Home Decoration) या वस्तू प्रदर्शनाचे उद्घाटन बुधवारी सायंकाळी मंगल मेटल शेजारील ओपन ग्राउंडवर झाले. कर्नाटक राज्य हँडीक्राफ्ट डेव्हलपमेंट कार्पोरेशनचे चेअरमन मारुती एम. अष्टगी यांच्या हस्ते आणि बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स ऍण्ड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष हेमेंद्र पोरवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.
प्रदर्शनाचे आयोजक सीमन एक्झिबिटर्सचे मॅनेजिंग डायरेक्टर नागचंद्र एम. एस. यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रदर्शन आयोजन करण्यामागचा उद्देश स्पष्ट केला. दीपावलीपूर्वी बेळगावकरांना फर्निचरबरोबरच नवनवीन घरगुती वस्तू उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून विविध स्टॉल्सवर ग्राहकांना सवलतीच्या दरात वस्तू उपलब्ध आहेत. त्याचा बेळगावकरांना निश्चित उपयोग होईल, अशी माहिती सांगितली.
याप्रसंगी बोलताना मारुती अष्टगी यांनी प्रदर्शनाच्या आयोजकांचे अभिनंदन करून या नवनवीन वस्तू बेळगावकरांच्या निश्चित पसंतीस उतरतील, असा विश्वास व्यक्त केला. याप्रसंगी अनंत लाड यांचेही भाषण झाले. यश कम्युनिकेशनच्या सहकार्याने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून याप्रसंगी यशच्या प्रकाश कालकुंद्रीकर यांनीही प्रदर्शनाबाबतची माहिती दिली.
दि. 19 ते 30 ऑक्टोबरपर्यंत चालणाऱया या प्रदर्शनात 70 हून अधिक वेगवेगळय़ा प्रकारचे मोठे स्टॉल्स असून नागरिकांना खरेदीचा आनंद लुटता येणार आहे. गृहशोभा म्हणजे घराची सजावट, त्या सजावटीसाठी लागणारे फर्निचर, सोफा सेट्स, चेअर्स, पडदे, 3 डी फोटो, ज्वेलरी, गॅसस्टोव्ह, राजस्थानी चुरण, लोणची, लेडीज डेसमटेरियल, कुर्ते पायजमा, लहान मुलांचे कपडे, खेळणी, स्वेटर्स, बॅग्स, इलेक्ट्रीकल स्कूटर्स, टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, केरळ आयुर्वेदिक तेल, म्हैसूर नमकीन, कॉस्मेटिक्स, फूटवेअर, खादी शर्ट, कारपेट, क्रोकरी आयटम्स, ड्रायपुट्स, आयुर्वेदिक औषधे, राजस्थानी जुते, किचन वेअर्स, इलेक्ट्रीक स्कूटर अशा नानाविध साहित्याने नटलेले हे प्रदर्शन बेळगावकरांना निश्चित आवडेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. यावेळी विनय कदम, विकास कलघटगी उपस्थित होते.