बेळगाव : गोगटे पदवीपूर्व वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयामध्ये सोमवारी युनियन आणि जिमखाना उपक्रमांचा उद्घाटन सोहळा पार पडला. कॉलेजच्या के. के. वेणुगोपाल सभागृहात हा कार्यक्रम झाला. बेळगाव येथील रामकृष्ण मिशन आश्रमाचे मोक्षात्मानंद स्वामिजी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. प्राचार्या डॉ. अंजना केरूर, प्रा. एस. बी. भेंडिगेरी, प्रा. आरती हेगडे व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात अदिती आणि ग्रुपच्या नृत्याने झाली. प्राचार्या अंजना केरूर यांनी स्वागत केले. प्रा. भारती हेगडे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व उद्घाटन समारंभ पार पडला. प्रा. अनिता राठोड यांनी स्टुडंट कौन्सिल मेंबर्सना शपथ दिली.
स्वामी मोक्षात्मानंदजी महाराज म्हणाले, विज्ञान, ज्ञान, चारित्र्य आणि सत्य यांची सांगड घालून विद्यार्थ्यांनी जगावे, वेळेचा सदुपयोग करून शिस्तबद्ध जीवनाचा अवलंब करावा, सोशल मीडियामधील अनेक घातक गोष्टींपासून दूर रहावे, असा संदेश त्यांनी दिला. सई पाटील आणि फेलिक्स यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. एस. बी. भेंडिगेरी यांनी आभार मानले.