Tarun Bharat

जांबोटी माध्यमिक शाळा विभागीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन

Advertisements

कणकुंबी : शिक्षण खात्यामार्फत घेण्यात येणाऱया माध्यमिक शाळांच्या जांबोटी विभागीय क्रीडा स्पर्धांचा उद्घाटन समारंभ विविध मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. या क्रीडा स्पर्धाचे यजमानपद माध्यमिक विद्यालय जांबोटीकडे होते. सदर क्रीडा स्पर्धा जांबोटी येथील बाबुराव ठाकुर महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर झाल्या. अध्यक्षस्थानी विश्व भारत सेवा समितीचे अध्यक्ष विजय नंदिहळ्ळी होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि फोटो पूजन झाले. मुख्याध्यापक महेश सडेकर यांनी स्वागत केले. यावेळी विश्वभारती क्रीडा केंद्राचे राज्याध्यक्ष अशोक शिंत्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण तर देणगीदार रवींद्र कळ्ळेकर यांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित करण्यात आली. बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्सचे संचालक विठ्ठल गवस यांच्या हस्ते क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी जांबोटी माध्यमिक विद्यालयाचे सेवानिवृत्त क्रीडा शिक्षक व खानापूर तालुका क्रीडा संघटनेचे माजी अध्यक्ष विश्वनाथ डिचोलकर यांचा जांबोटी विभागाच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी अशोक शिंत्रे, लैला शुगरचे कार्यकारी संचालक सदानंद पाटील, प्राचार्या पूजा पाटकर व संस्थेचे अध्यक्ष विजय नंदिहळ्ळी यांची मार्गदर्शन करणारी भाषणे झाली. तुकाराम सडेकर यांनी सूत्रसंचालन केले तर मुख्याध्यापक एस. जी. चिगुळकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाला प्राचार्या पूजा पाटकर, ग्राम पंचायत अध्यक्ष महेश गुरव, उद्योजक विठ्ठल गवस व रवेंद्र कळ्ळेकर तसेच जांबोटी, कणकुंबी, ओलमणी, बैलूर, आमटे, निलावडे व कान्सुली हायस्कूलचे मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक व सहशिक्षक उपस्थित होते.

Related Stories

‘बालविवाह’वर पीडीओंचा राहणार वॉच

Amit Kulkarni

रणवीर, गगन, आदित्य, अर्णा विजेते

Amit Kulkarni

राज्यात कोरोना संख्या वाढत असताना आयसीयू बेड आणि व्हेंटिलेटरची गरज : डॉक्टरांची मागणी

Abhijeet Shinde

बदलत्या हवामानाने रब्बी हंगाम संकटात

Patil_p

‘हनीट्रप’ प्रकरणी पाच जणांची टोळी गजाआड

Patil_p

जांबोटी-कणकुंबी भागातील शाळांसाठी 1 कोटी 10 लाख

Omkar B
error: Content is protected !!