पुणे / प्रतिनिधी :
Inauguration of ‘Lokmanya’s Customer Service Lounge today लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी’च्या शास्त्री रोड, पुणे स्थित ‘ग्राहकसेवा लाउंज’चा उद्घाटन सोहळा आज (शनिवारी) रात्री आठ वाजता राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते तसेच ‘लोकमान्य’चे संस्थापक-अध्यक्ष किरण ठाकुर यांच्या उपस्थितीत होणार आहे. या लाउंजद्वारे ग्राहक-सभासदांना विशेष सेवासुविधा, वित्तीय सेवांसह बहुउद्देशीय सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे गुंतवणुकीसाठी व्यवस्थापन व मार्गदर्शनसुद्धा मिळणार आहे. सहकार क्षेत्रात होणाऱ्या या वेगळय़ा प्रयत्नाचा श्रीगणेशा ‘लोकमान्य सोसायटी’कडून होत आहे. या वेळी ठेवीदार, सभासद, हितचिंतकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक वाचा : महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढला