प्रतिनिधी/ बेळगाव
केएलई तांत्रिक विद्यापीठाच्या डॉ. एम. एस. शेषगिरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी येथे एमबीए प्रोग्रॅमच्या 14 व्या बॅचचे तसेच विद्यापीठांतर्गत येणाऱ्या दुसऱ्या बॅचचे उद्घाटन प्राचार्य डॉ. बसवराज कटगेरी यांनी केले.
ते म्हणाले, आपले करिअर घडविण्यासाठी आपले शैक्षणिक ज्ञान वाढविणे, वक्तशीरपणा आणि चिकाटी आवश्यक आहे. तांत्रिक विद्यापीठाचा नवीन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना त्यांचे कौशल्य वाढविण्यासाठी तसेच बहुविध शाखांचा अभ्यास करण्यासाठी साहाय्यभूत ठरते.
एमबीए विभागप्रमुख डॉ. प्रयाग गोखले यांनी स्वागत केले. प्रास्ताविकात त्यांनी तांत्रिक विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाची माहिती दिली. ‘एक पदवीधर ते कुशल व्यवस्थापक’ हा प्रवास कसा घडतो, याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले. त्रिवेणी व अपूर्वा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. वैभव बडगी यांनी आभार मानले.