Tarun Bharat

पणजीत बँडीकूट रोबोट्सचे उद्घाटन

प्रतिनिधी / पणजी

भारतातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ असलेल्या गोव्याने शहरातील मॅनहोल्स प्रभावी आणि सुरक्षित पद्धतीने स्वच्छ करण्यासाठी पणजीमध्ये बँडीकूट रोबोट्स तैनात केले आहेत. या उपक्रमामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याला शहराची स्वच्छता अधिक स्मार्ट पद्धतीने राखण्यात मदत होईल. सदर बँडीकूट रोबोटचे उद्घाटन साबांखा मंत्री निलेश काब्राल यांच्याहस्ते पणजी येथील टाऊन हॉलमध्ये करण्यात आले. यावेळी मंत्र्यांनी पणजीचे मनपाचे महापौर रोहित मोन्सेरात यांना चावी सुपूर्द केली. या कार्यक्रमाला मनपा आयुक्त आग्नेलो फर्नांडिस, उपमहापौर संजीव नाईक, शहर अभियंता संतोष म्हापणे, विवेक पारसेका उपस्थित होते.

मागील महिन्यात मडगाव येथे पहिला बँडीकूट रोबोटचे उद्घाटन करण्यात आले होते. या उपक्रमामुळे गोव्याच्या पर्यटन उद्योगातही भर पडेल असा सरकारचा अंदाज आहे. बँडीकूट रोबोट हा जगातील पहिला मॅनहोल क्लीनिंग रोबोट आहे जो मेकइनइंडिया आणि स्वच्छ भारत उपक्रमाद्वारे राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या स्टार्ट-अप जेनरोबोटिक्सने विकसित केला आहे. मडगावनंतर गोव्यातील बँडीकूट रोबोट्स वापरणारे पणजी हे दुसरे शहर आहे. सदर रोबोट फक्त गोव्यातच नाही, तर भारतातील अनेक शहरांमध्ये काम करत आहे. आणि ते खूप चांगले काम करत असल्याचे मंत्री काब्राल यांनी सांगितले. सदर रोबोट 100 टक्के सफाई कार्यक्षमनेते मॅनहोल ब्लॉकेजेस साफ करण्याच्या इतर मार्गापेक्षा जास्त कामगिरी करतात.

 “गोव्यात बँडीकूट रोबोट्सचे स्वागत केल्याबद्दल धन्यवाद. आमच्या रोबोटिक सोल्यूशन्सद्वारे, आम्ही गोव्यातील स्वच्छता कामगारांना अधिक सुरक्षितता प्रदान करण्याचे उद्दिष्ट ठेवतो, तसेच उत्तम उत्पादकता तसेच आर्थिक कार्यक्षमतेतही असतो. असे जेनरोबोटिक्सचे सहसंस्थापक व व्यवस्थापकीय संचालक रशीद यांनी सांगितले.

Related Stories

कर्नाटक पोलिसांकडून बेकायदा स्पिरीट जप्त

Amit Kulkarni

केळबाई आजोबा देवस्थानचा पारंपरिक शिगमोत्सव 21 वर्षानंतर साजरा होणार

tarunbharat

मडगाव रवींद्र भवनच्या आकाशकंदील कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Amit Kulkarni

सिद्धकलातर्फे 27 रोजी भरतनाटय़म कार्यक्रम

Amit Kulkarni

लोकायुक्तांचा आदेश हायकोर्टात रद्दबातल

Patil_p

गोमेकॉत औषधे खरेदीत 250 कोटींचा घोटाळा

Amit Kulkarni