प्रतिनिधी /पर्वरी
येथील चोगम रोडवर टेक्नोसिदाद इमारतीत धी जन उत्कर्ष अर्बन को-ऑपरेटीव्ह पेडिट सोसायटी लिमिटेडच्या 10 व्या शाखेचे उदघाटन पर्यटनमंत्री रोहन खवटे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी साळगावचे आमदार केदार नाईक, म्हापशाच्या नगराध्यक्षा शुभांगी वायगंणकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, फा. कायतानो फर्ना?डीस, संस्थेचे अध्यक्ष नारायण कारेकर, उपाध्यक्ष श्रीरंग नागवेकर, सरव्यवस्थापक, सुरेश आरोलकर उपस्थित होते.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना मंत्री रोहन खंवटे म्हणाले, एकादी सोसायटी किंवा संस्था तयार करणे, ती सांभाळणे, वाढवणे फायद्यात आणणे हे कठीण असे मोठे आव्हान आहे.
आम्ही अंतोदय तत्वाचा विचार करत असल्यास पत संस्था?ची आज अत्यंत गरज आहे. या संस्था?मुळे समाजातील लहानातील लहान घटकाला व्यवसाय थाटण्यास मदत मिळेल. पर्वरी व साळगाव परिसरातील व्यवसायिक अशा भागात संस्थेने ही शाखा सुरू करून आपला प्रसार वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. ही त्यांची वाटचाल अशीच सुरू राहून या संस्थेचा फायदा सर्वांना मिळावा, अशी अपेक्षा खंवटे यांनी व्यक्त केली.
आमदार केदार नाईक व भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी मनोगत व्यक्त करून संस्थेला शुभेच्छा दिल्या. चेअरमन नारायण कारेकर यांनी स्वागतपर भाषणात संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला.
मान्यवरांच्या हस्ते फित कापून व समईप्रज्वलित करून शाखेचे उदघाटन करण्यात आले. सूत्रसंचालन वसूली अधिकारी नारायण शिंदे यांनी तर आभार उपाध्यक्ष श्रीरंग नागवेकर यांनी मानले.