बेळगाव : बेळगाव विमानतळ परिसरात उभारलेल्या खासगी वैमानिक प्रशिक्षण केंद्राचे बुधवारी उद्घाटन करण्यात आले. केंद्रीय हवाई उ•ाण राज्यमंत्री जनरल व्ही. के. सिंग यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एफटीओचे उद्घाटन केले. बेळगावमध्ये पहिल्यांदाच खासगी प्रशिक्षण केंद्र सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना वैमानिक प्रशिक्षण घेणे सोईस्कर होणार आहे. मे 2021 मध्ये बेळगावसह कलबुर्गी, जळगाव, खजुराहो व लिलाबरी येथे एफटीओ मंजूर करण्यात आले. देशात वैमानिकांची खासगी प्रशिक्षण केंद्रे सुरू करण्यास एफटीओंना परवानगी देण्यात आली. ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्त्वावर बेळगाव विमानतळामध्ये पाच हजार चौ. मी. जागा 25 वर्षांच्या करारावर दिली. रेडबर्डने हँगर भरणी करत प्रशिक्षण केंद्र सुरू केले. य् ाावेळी रेडबर्ड कंपनीचे अध्यक्ष करण मान, खासदार मंगला अंगडी, संजीव बन्सल व विमानतळ अधिकारी उपस्थित होते.
Previous Articleसिद्धेश्वरच्या दर्शनासाठी जनसागर
Next Article लोककल्प फौंडेशनतर्फे मोतीबिंदू शस्त्रक्रिया
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.