Tarun Bharat

जनसंपर्क कार्यालयाचे आज हिंडलग्यात उद्घाटन

सर्व नागरिकांनी उद्घाटन समारंभाला उपस्थित राहण्याचे आवाहन

वार्ताहर /हिंडलगा

बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी माजी मंत्री व आमदार रमेश जारकीहोळी आणि हिंडलगा ग्राम पंचायत अध्यक्ष तसेच उद्योजक नागेश मनोळकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे शनिवार दि. 24 रोजी विजयनगर, हिंडलगा येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे.

बेळगाव ग्रामीण मतदारसंघ खऱ्या अर्थाने विकासापासून वंचित राहिला आहे. केवळ निवडणुका नजरेसमोर ठेऊन विकासाचे गाजर दाखविले जात आहे. भाजपच्या माध्यमातून गोरगरिबांच्या समस्या सोडविण्यासह त्यांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी आमदार रमेश जारकीहोळी यांनी स्वत: ग्रामीण मतदारसंघात लक्ष दिले आहे. यासाठी शनिवारी सकाळी साडेदहा वाजता दुसरे बस स्टॅण्ड, विजयनगर, हिंडलगा येथे जनसंपर्क कार्यालय सुरू केले जात आहे. आठवड्यातून दोन दिवस स्वत: आमदार जारकीहोळी व उद्योजक नागेश मनोळकर या ठिकाणी जनतेसाठी उपलब्ध राहतील. येथे ग्रामीण मतदारसंघातील विकासकामावर लक्ष पुरविले जाणार आहे. तसेच बेळगाव ग्रामीण मतदारसंघाला आदर्श मतदारसंघ करण्याचा जारकीहोळी यांचा मानस आहे. ग्रामीणमधील जनतेसाठी हे हक्काचे व्यासपीठ ठरणार असून या ठिकाणी लोक आपली कैफियत मांडू शकणार आहेत. त्यामुळे नागरिकांची अडलेली कामे पूर्णत्वास जाण्यास मदत होईल. याशिवाय आमदार जारकीहोळी, नागेश मनोळकर यांच्यासह त्यांचे ज्येष्ठ बंधू माजी ग्राम पंचायत अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र मनोळकरदेखील याठिकाणी उपलब्ध राहणार आहेत. मनोळकर बंधूंनी गावामध्ये विविध उपक्रम राबवून गावचा कायापालट करण्यासाठी परिश्रम घेतले आहेत.

भाजपच्या मदतीने ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवीच्या यात्राकाळात कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करून घेत विविध कामांची पूर्तता केली. तसेच गावातील सर्व मंदिरांच्या जीर्णोद्धार कार्यात मनोळकर बंधूंनी पुढाकार घेत सिंहाचा वाटा उचलला आहे. त्यामुळे हिंडलग्यासह तालुक्यात आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. यापुढे कार्यालयाच्या माध्यमातून जनतेशी संपर्क साधून सामाजिक कार्यात कार्यरत राहण्याचा निर्धार केला आहे. तरी सर्व नागरिकांनी उद्घाटन समारंभाला वेळेवर उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

रोजगारनिर्मितीसाठी औद्योगिक वसाहत सुरू करण्याचा मानस

बेळगाव ग्रामीण मतदारसंघ मला आदर्श मतदारसंघ म्हणून पहायचा आहे. केवळ विकासाचे गाजर दाखवून मतदारसंघाचा विकास केला जाऊ शकत नाही. रस्ते आणि गटारी करून विकास झाला, असे म्हणता येत नाही. लोक खऱ्या अर्थाने समाधानी झाले पाहिजेत. यापुढे ग्रामीण भागात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने शिक्षण संस्था उभारून विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविण्यात येणार आहे. शिवाय रोजगारनिर्मितीसाठी औद्योगिक वसाहत सुरू करण्याचा मानस आहे. यासह पिण्याचे पाणी, रस्ते, व इतर मूलभूत सुविधा पुरविण्याची गरज आहे. त्यासाठी नागरिकांच्या समस्या जाणून त्या सोडविण्यात येणार आहेत.

-आमदार रमेश जारकीहोळी

आठवड्यातून दोन दिवस समस्या जाणून घेणार

लोकांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी संपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले जात आहे. सर्वांनी मिळून यासाठी कार्य केले पाहिजे. ग्रामीण मतदारसंघातील लोकांना याचा नक्कीच फायदा होईल. आठवड्यातून दोन दिवस या ठिकाणी लोकांच्या समस्या जाणून घेतल्या जातील.

-नागेश मनोळकर, अध्यक्ष हिंडलगा ग्राम पंचायत

Related Stories

प्लास्टिक बाटल्यांसह डेनेज पाईपही नाल्यात

Amit Kulkarni

खानापूरमधील ‘त्या’ बोगस डॉक्टरांवर कारवाई करा

Amit Kulkarni

डॉ. शुभदा शहा यांचे आज व्याख्यान

Patil_p

म्हैस पळविण्याची शर्यत उत्साहात

Amit Kulkarni

मनपा मतदार याद्यांचे काम अंतिम टप्यात

Patil_p

पुन्हा अतिथी शिक्षकांवर गंडांतर येणार?

Patil_p
error: Content is protected !!