Tarun Bharat

नावगे येथे विज्ञान प्रयोगशाळा, फुले स्मारकाचे उद्घाटन

वार्ताहर /किणये

नावगे येथील प्राथमिक मराठी शाळेत विज्ञान प्रयोगशाळा व महात्मा फुले स्मारकाचे उद्घाटन असा संयुक्त कार्यक्रम सोमवारी उत्साहात पार पडला. अध्यक्षस्थानी सूर्यकांत कार्लेकर होते. बेळगावमधील प्रसिद्ध उद्योजक जयंत हुंबरवाडी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून विज्ञान प्रयोगशाळेचे फीत कापून उद्घाटन केले.

प्रास्ताविक मुख्याध्यापक सुतार यांनी केले. व्यासपीठावर रोटरी क्लब ऑफ बेलगाम सेंट्रलचे अध्यक्ष रवी हत्तरगी, सेपेटरी अमित पाटील, माधवानंद कारेकर, सातेरी कामती, के. एल. लगारे, ग्राम पंचायत अध्यक्षा अर्चना चिगरे, बसवानी सुतार, बसवानी मोटणकर, आपुनी पाटील, अनिल पाटील, तानाजी गुरव, नागाप्पा तुर्केवाडी, ग्राम पंचायत उपाध्यक्ष भरमानी पाटील आदी उपस्थित होते.

एसडीएमसी अध्यक्ष चांगाप्पा येळ्ळूरकर व कमिटीतील सदस्यांतर्फे उपस्थितांचे स्मृतिचिन्ह देऊन स्वागत केले. नावगे येथील प्राथमिक मराठी शाळेत महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या मूर्ती उभारण्यात आल्या आहेत. या फुले स्मारकाचे उद्घाटन डी. बी. पाटील व ऍड. सुधीर चव्हाण यांच्या हस्ते केले. यावेळी शिक्षण खात्याचे डॉ. एम. एस. मेदार, ऍड. शाम पाटील आदींची भाषणे झाली.

उद्घाटनानंतर विद्यार्थ्यांनी विविध उपकरणांची माहिती दिली. कर्ले येथील ज्योती हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या जीवनचरित्रावर आधारित गीत सादर केले.

Related Stories

जाएन्ट्स ग्रुप ऑफ बेळगाव सखीच्यावतीने महापालिका आयुक्तांना निवेदन

Tousif Mujawar

शहर परिसरात भाऊबीज साजरी

Patil_p

मुलाने केलेल्या चाकू हल्ल्यातील जखमी पित्याचा मृत्यू

Patil_p

उचगावमध्ये दिवसाढवळय़ा धाडसी चोरी

Amit Kulkarni

बेळगाव जिल्हय़ाचा निकाल 87.80 टक्के

Omkar B

खानापूर म. ए. समितीचा पाठिंबा

Amit Kulkarni