प्रतिनिधी /बेळगाव
नवहिंद युवक मंडळाच्या श्री तुळजा भवानी महिला मंडळाचे उद्घाटन बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गल्लीतील पंचमंडळी, महिला कार्यकर्त्या, नगरसेवक, भाजप महिला मंडळ अध्यक्षा शिल्पा केकरे उपस्थित होत्या. महिला मंडळाच्या नूतन अध्यक्षा म्हणून सविता पाटील, उपाध्यक्ष म्हणून शिवानी रजपूत, सेपेटरी सरोजा पवार यांची नेमणूक करण्यात आली.