प्रतिनिधी / बेळगाव
तऊण असणे आणि तऊण दिसणे यात फरक आहे. ताऊण्यामध्ये संयम पाळणे महत्त्वाचे आहे. तऊणाईने आपल्यातील ऊर्जा समाजाच्या विकासासाठी खर्च करावी, असे आवाहन जेएनएमसीचे उपप्राचार्य डॉ. राजेश पोवार यांनी केले.
सेंट पॉल्स पीयू कॉलेजच्या ‘ऊर्जा’ या वार्षिक महोत्सवाचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. तीन दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात विद्यार्थ्यांसाठी अनेक स्पर्धा आणि खेळांचे आयोजन केले आहे. उद्घाटनप्रसंगी महाविद्यालयाचे प्रशासक फादर स्टीव्हन अल्मेडा यांनी ऊर्जा शब्दाचा अर्थ सांगितला. साहित्यिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील युवकांचे महत्त्व सांगितले.
सेंट पॉल संस्थेचे व्यवस्थापक आणि रेक्टर फादर रोनाल्ड डिसोझा, प्राचार्य डॉ पद्मिणी रवींद्रन यांचीही भाषणे झाली. महिला प्रतिनिधी सुफिया सय्यद सरचिटणीस सॅम्युअल जोय हुदली आणि प्रा. रोमा शिराळकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.