Tarun Bharat

व्हीटीयूमध्ये राज्यस्तरीय प्रदर्शनाचे उद्घाटन

Advertisements

प्रतिनिधी /बेळगाव

केएससीएसटी आयोजित 45 व्या राज्यस्तरीय प्रकल्प प्रदर्शनाचे शुक्रवारी व्हीटीयू सभागृहात उद्घाटन झाले. केएससीएसटीचे सेपेटरी प्रा. अशोक रायचूर यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. दोन दिवस चालणाऱया या प्रदर्शनामध्ये राज्यातील विद्यार्थ्यांनी केलेले प्रकल्प इतर विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी ठेवण्यात आले आहेत.

  विद्यार्थ्यांमध्ये नवनिर्मितीची क्षमता आहे. त्या विद्यार्थ्यांना योग्य पद्धतीचे प्रोत्साहन व मार्गदर्शन मिळाल्यास ते विद्यार्थी कोठेही कमी पडणार नाहीत असे प्रा. रायचूर यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. करीसिद्दप्पा उपस्थित होते.

डॉ. करीसिद्दप्पा म्हणाले, विद्यार्थ्यांनी आपल्या बुद्धीमत्तेचा वापर करून उद्योग करावेत. नवीन संकल्पना, संशोधन यामुळे देशाचा विकास होणार आहे. विद्यार्थ्यांनी उद्योगाच्या सहाय्याने इतरांना व्यवसाय उपलब्ध करून द्यावा असे त्यांनी सांगितले. यावेळी हेमंतकुमार, प्रा. ए. एस. देशपांडे, प्रा. बी. ई. रंगास्वामी उपस्थित होते. एक हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी पहिल्याच दिवशी प्रदर्शनाला उपस्थिती दर्शविली.

Related Stories

टक्केवारी मागणारे जि.पं.सहाय्यक अभियंते पाप कोठे फेडणार?

Patil_p

आंतरराज्य बससेवेसाठी शासनाच्या निर्णयाकडे लक्ष

Amit Kulkarni

आय केअर चॅरिटेबल ट्रस्टतर्पे नेत्र तपासणी शिबिर-कोरोना योद्धय़ांचा सत्कार

Omkar B

दिवाळी पाडव्यामुळे कोटय़वधीची उलाढाल

Patil_p

आप्पाचीवाडी येथे कोरोना लसीकरण

Patil_p

बस ‘बंद’चा परिणाम खानापूर बाजारपेठेवर

Omkar B
error: Content is protected !!