Tarun Bharat

तळेवाडा बेतकी शाळेच्या शेड, रंगमंचाचे उद्घाटन

वार्ताहर /माशेल

 तळेवाडा बेतकी येथील सरकारी प्राथमिक शाळेच्या प्रांगणात उभारण्यात आलेली शेड व रंगमंचाचे उद्घाटन स्थानिक आमदार तथा क्रीडामंत्री गोविंद गावडे यांच्याहस्ते करण्यात आले. बेतकी खांडोळा पंचायतीतर्फे अंदाजे रु. 5 लाख खर्चून बांधण्यात आलेल्या या शेडमुळे पावसाळय़ात सांस्कृतिक कार्यक्रम व अन्य उपक्रम राबविताना होणारी गैरसोय दूर झाली आहे.

कार्यक्रमाला माजी सरपंच दिलीप नाईक, जिल्हा पंचायत सदस्य श्रमेश भोसले, भावन नाईक, ग्रामस्थ, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी बोलताना मंत्री गोविंद गावडे म्हणाले, स्थानिक पंचायतीने विद्यार्थ्यांसाठी रंगमंच उपलब्ध करून एक चांगले कार्य केले आहे. त्याचा उपयोग शाळेच्या विद्यार्थ्यांबरोबर गावातील लोकांनाही होणार आहे. मतदारसंघातील सर्व शाळामध्ये विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची सुविधा अपुरी पडू नये यासाठी आपले प्रयत्न असून मतदारसंघातील प्रत्येक शाळा आज सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

दिलीप नाईक यांचेही भाषण झाले. भावना नाईक यांनी स्वागत केले.

Related Stories

प्रदीप शेट यांना अध्यक्षपदावरुन हटवा

Amit Kulkarni

पोलीस व सर्व सरकारी यंत्रणांनी कठोर व्हावे.

Patil_p

झुआरीनगरातील महामार्गाशेजारी बिबटय़ाचा संचार

Omkar B

दाबोळी विमानतळावर दहा लाखांचे सोने जप्त

Amit Kulkarni

आपल्या स्वार्थापोटी भाजपवर टिका करणे आम्ही खपवून घेणार नाही- मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

Amit Kulkarni

डिचोली साखळीत पावसाच्या सरी

Amit Kulkarni