Tarun Bharat

मराठी शाळेतील नव्या ध्वजस्तंभाचे उद्घाटन

Advertisements

खानापूर / प्रतिनिधी

येथील उच्च प्राथमिक मराठी शाळेत आजादी का अमृतमहोत्सव साजरा करण्यासाठी नव्याने बांधण्यात आलेल्या ध्वजस्तंभाचे उद्घाटन शनिवारी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

मराठी शाळेत स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव निमित्ताने नवा ध्वजस्तंभ उभारण्यात आला. नवनिर्वाचित एसडीएमसी पदाधिकाऱयांनी पुढाकार घेऊन तो उभारला आहे. आजादी का अमृतमहोत्सव निमित्ताने त्याचे उद्घाटन करण्यात आले. तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष आय. आर. घाडी, भूविकास बँकेचे चेअरमन मुरलीधर पाटील, विवेक गिरी, निवृत्त शिक्षिका अरुंधती दळवी, गुंडू तोपिनकट्टी, एसडीएमसी अध्यक्ष धाकलू गुरव, उपाध्यक्ष जयश्री गुरव आदी सदस्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. यावेळी ऍड. घाडी यांच्या हस्ते नूतन ध्वजकट्टय़ाचे उद्घाटन केल्यानंतर उपस्थितांच्या हस्ते ध्वज फडकावून आजादी का अमृतमहोत्सवाला सुरुवात करण्यात आली. यानंतर झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी धाकलू गुरव होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक विलास सावंत यांनी केले. स्वागत जे. पी. पाटील यांनी केले. टी. बी. मोरे यांनी आजादी का महोत्सवाबाबत माहिती दिली. विवेक गिरी यांनी शाळेच्या विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांबद्दल माहिती दिली. येत्या वर्षभरात शाळेचा कायापालट करण्यासाठी एसडीएमसी, दानशूरांच्या योगदानातून हा प्रयोग राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. शाळेच्या विकासासाठी पत्रकाचे आणि पावती पुस्तिकेचे अनावरण ऍड. घाडी व मुरलीधर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आय. आर. घाडी, मुरलीधर पाटील यांनी प्रत्येकी 5 हजार रुपयांची देणगी दिली.

मावळत्या एसडीएमसांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार तर नवीन सदस्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी धाकलू गुरव, मंगला गुरव, शंकर गुरव, टोपाण्णा गुरव, भुजंग गुरव, नामदेव मिसाळ, पुंडलिक लोंढेकर, सचिन गुरव, सटवाजी गुरव, हंबीरराव केसरेकर, श्वेता उशीणकर, नमिता गुरव, संध्या गुरव, सुमित्रा बजंत्री, पूजा नाईक, रूपाली सुतार व गौतमी सुतार यांचा सत्कार करण्यात आला.       

Related Stories

संकेश्वरात सीलडाऊन अंमलबजावणी कडकच

Patil_p

‘लोकमान्य’च्या उचगाव शाखेतर्फे ऋचा पावशे हिचा गौरव

Amit Kulkarni

कंग्राळी बुद्रुक कलमेश्वर मंदिरात नवचैतन्य

Amit Kulkarni

कॅन्टोन्मेंट बोर्डने थकविले 2 कोटी 41 लाखाचे वीजबिल

Patil_p

रेल्वेस्थानकासमोरील बसस्थानकाच्या कामाची गती वाढवा

Patil_p

जाधवनगरात बिबटय़ाची दहशत

Amit Kulkarni
error: Content is protected !!