प्रतिनिधी /बेळगाव
‘जय शिवराय’चा अखंड गजर, ढोल-ताशांचा ठेका, टाळ-मृदुंगांच्या साथीने सादर होणारे भजन, एकाहून एक सरस देखाव्यांमुळे शिवजयंती चित्ररथ मिरवणूक लक्षवेधी ठरली. कोरोनाचे सावट दूर झाल्याने प्रत्येक मंडळाने विलक्षण धडपड करून देखावे सादर केले. शिवाय आजच्या समाजासमोर असलेल्या अनेक प्रश्नांना तरुणाईने अधोरेखित केले.
पारंपरिक सनई, टाळ-मृदुंगाच्या गजरात मिरवणुकीचे उद्घाटन जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्या हस्ते करण्यात आले. मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव महामंडळातर्फे बुधवारी सायंकाळी 6.30 वाजता मिरवणुकीचे उद्घाटन झाले. मंडळाचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मिरवणुकीला सुरुवात झाली. याप्रसंगी आमदार अनिल बेनके, पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, उपायुक्त रविंद्र गडादी, उपायुक्त पी. व्ही. स्नेहा, बुडा अध्यक्ष संजय बेळगावकर, महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर, माजी महापौर शिवाजी सुंठकर, सरिता पाटील, किरण सायनाक, मालोजी अष्टेकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, नगरसेविका वैशाली भातकांडे, युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, भाजपचे नेते किरण जाधव आदींच्या उपस्थितीत मिरवणुकीला सुरुवात झाली.
मिरवणुकीच्या शुभारंभाला सनईच्या सुरांची साथ
नरगुंदकर भावे चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पालखीचे पूजन झाले. पारंपरिक पद्धतीने प्रथम अनगोळ येथील श्रीकृष्ण सनई यांचे सनईवादन झाले. सनई-चौघडय़ांच्या मंगल सुरांमध्ये मिरवणुकीला सुरुवात झाली. वडगाव येथील भजनी मंडळाने अखंड नामजप करत लक्ष वेधून घेतले होते.
मिरवणूक वेळेत सुरू होण्यासाठी मंडळांची धडपड
दरवषी वेळेत देखावे सादर होत नसल्याने शिवभक्तांमधून नाराजी व्यक्त होत होती. त्यामुळे यावषी बुधवारी पहाटेपासूनच मिरवणूक मार्गावर मंडळांनी गाडे आणून उभे केले होते. शिवाजी रोड येथील सहय़ाद्रीपुत्र युवक मंडळाने पालखी निघण्यापूर्वीच देखावा दाखविण्यास सुरुवात केली. बाजारात झालेली शिवभक्तांची गर्दी पाहून त्यांनी देखावा सादर केला.
रणरागिणींच्या ध्वजपथकाने वेधले लक्ष
बालिका आदर्श विद्यालयाच्या रणरागिणी ध्वजपथकाने शिवभक्तांचे लक्ष वेधून घेतले. 125 हून अधिक ध्वजधारी बालिका यामध्ये सहभागी झाल्या होत्या. हातात नाचविले जाणारे भगवे ध्वज आणि त्यांनी दिलेली सलामी अनेकांना उत्साही बनवत होती. या ध्वजपथकाला नरवीर ढोल-ताशा पथकाच्या 60 वादकांनी तितक्मयाच तोलामोलाची साथ दिली.
अग्रभागी असलेल्या पालखीच्या बरोबरीने स्थानिक भजनी मंडळांचे पथक दाखल झाले होते. यापाठोपाठ चित्ररथ येत होते. उद्घाटनप्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख बंडू केरवाडकर, मदन बामणे, सुहास किल्लेकर, अंकुश केसरकर, श्रीकांत कदम, तालुका पंचायत माजी सदस्य सुनील अष्टेकर, चित्ररथ महामंडळाचे अध्यक्ष सुनील जाधव, लक्ष्मण होनगेकर, गणेश दड्डीकर, प्रकाश मरगाळे, वैजनाथ पाटील, रणजीत चव्हाण-पाटील, राजू पिंगट, शिवराज पाटील, धनंजय पाटील, सूरज कणबरकर, युवा सेनेचे विनायक हुलजी, एपीएमसी माजी सदस्य महेश जुवेकर, माजी महापौर विजय मोरे, किरण धामणेकर, अभिजित मजुकर, महादेव चौगुले, वीरेश किवडसण्णावर, मेघन लंगरकांडे व मान्यवर उपस्थित होते.
वैविध्यपूर्ण प्रसंगांचे सादरीकरण
वैविध्यपूर्ण प्रसंगांचे नेमके सादरीकरण हे यंदाच्या चित्ररथ मिरवणुकीचे वैशिष्टय़ ठरले. विशेष म्हणजे महिलांनीही स्वतंत्रपणे देखावा सादर करून ‘हम भी कुछ कम नही’ हे दाखवून दिले.
महिलांनी साकारला देखावा
ताशिलदार गल्ली येथील चित्ररथावर महिला व युवतींनी सुरतेची लूट हा अप्रतिम सजीव देखावा सादर केला. या देखाव्यात पुरुषांचीही पात्रे महिलांनीच साकारली. त्यामुळे शिवरायांचे खरे विचार या देखाव्यातून पहावयास मिळाले. स्वाती चौगुले हिने वठविलेली शिवाजी महाराजांची भूमिका वाहवा मिळवून गेली. महिलादेखील संधी मिळाल्यास आपल्या कलागुणांनी त्याची सुवर्णसंधी करू शकतात, हे या देखाव्यातून पहावयास मिळाले.
अन् साऱयांच्याच अंगावर आले शहारे….
पवार गल्ली-शहापूर येथील ओमकार तरुण मित्र मंडळाने छत्रपती संभाजी महाराजांच्या अत्याच्यावरील प्रसंगाच्या देखाव्याचे सादरीकरण केले. छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबाला आपण मृत्यूलाही घाबरत नाही हे दाखवून दिले. याचे सादरीकरण करून साऱयांचीच वाहवा मिळविली. या प्रसंगाने उपस्थितांच्या अंगावर शहारे आले.
छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत प्रमोद सावंत, औरंगजेबाच्या भूमिकेत गजानन काजोळकर आणि कवी कलश यांच्या भूमिकेत शुभम पवार यासह इतर कलाकारांनी आपली कला सादर केली. विविध चौकांमध्ये थांबून हे सादरीकरण करण्यात येत होते. सादरीकरण पाहण्यासाठी मोठी गर्दी उसळत होती.
आणि रयतेचा राजा कसा होता….
मोगलशाही, आदिलशाही यांनी रयतेवर जे अन्याय केले ते सहन होण्यापलीकडचे होते. रयतेवर होणारे अन्याय थांबविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सरदारांना दिलेल्या सूचनांचे सादरीकरण केले. रयतेने पिकवलेल्या देटालाही धक्का पोहोचू नये यासाठी सरदारांना आदेश दिले होते. त्या आदेशाचे सादरीकरण भारतनगर-पहिला क्रॉस, शहापूर येथील नेताजी सुभाष युवक मंडळाने केले.
‘शिवबा राजे आले जिंकुनी जगभरी’ हे गाणे सादर करून मोठी रंगत आणली होती. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळय़ांनी केलेला पराक्रम यावरून दाखविण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांचे पात्र गणेश उसुलकर तर शाहीरचे पात्र सागर मुतगेकर यांनी सादर केले. रोहित भातकांडे, सुयोग सामजी, प्रथमेश शहापूरकर यांनी शेतकरी म्हणून गीत सादर केले. त्यांना प्रितमी मजुकर, श्रेया राशिंगकर, सानिका लेष्कर यांनी साथ दिली. याचबरोबर बालकलाकारांनीही आपली कला दाखवून साऱयांचीच मने जिंकली.
हा चित्ररथ देखावा यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष प्रशांत लेष्कर, उपाध्यक्ष गणेश देसूरकर, सेपेटरी प्रभाकर अष्टेकर, परशराम बामणे, किरण हुद्दार यांनी परिश्रम घेतले.
अनसूरकर व बापट गल्ली येथील शिवजयंती मंडळाने शिवजन्माचा देखावा सादर केला. शिवबाला पाळण्यात घालण्याच्या देखाव्याने उपस्थितांची दाद मिळविली. माळी गल्ली येथील शिवजयंती उत्सव मंडळाने अफझल खान वधाचा देखावा सादर केला. कवी भूषण यांची महाराजांच्या प्रति असणारी एकनि÷ता दाखविणारा प्रसंग एका मंडळाने सादर केला. या मंडळाने प्रसंग सादरीकरण वास्तवदर्शी वाटावे यासाठी मांडलेली चूल आणि अन्य नेपथ्य यामुळे हा प्रसंग प्रभावी ठरला. भोई गल्ली येथील नवस्फूर्ती युवक मंडळाने ‘शिवकालीन युद्धकला’ असे देखावे सादर केले.
शिवभक्तांना प्रसादाचे वाटप
बेळगावसह आसपासच्या परिसरातून हजारो शिवभक्त शिवजयंती चित्ररथ मिरवणूक पाहण्यासाठी बेळगावमध्ये येतात. या शिवभक्तांना अल्पोपाहार उपलब्ध व्हावा या दृष्टिने यावषीपासून काही संस्था व संघटनांनी प्रसादाचे वाटप सुरू केले. जय किसान भाजीमार्केट व्यापाऱयांकडून समादेवी गल्लीत प्रसादाचे वाटप करण्यात आले. याचबरोबर हुतात्मा चौक परिसरात युवा सेनेच्या पदाधिकाऱयांनी शिवभक्तांना अल्पोपाहार दिला. हजारो नागरिकांनी या प्रसादाचा आस्वाद घेतला.